Makrand Patil- Dhairyasheel Kadam Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Satara Politic's : मकरंदआबांच्या वाईत जाऊन आमदार धैर्यशील कदमांनी फुंकले निवडणुकीचे रणशिंग; राष्ट्रवादी पुन्हा ‘टार्गेट’वर

Dhairyasheel Kadam Statement : भाजपचे आमदार धैर्यशील कदम यांनी सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची निवडणूक ताकदीने लढवण्याची घोषणा केली. त्यामुळे राष्ट्रवादीचे मंत्री मकरंद पाटील यांच्यासोबत नव्या राजकीय संघर्षाची चिन्हे दिसत आहेत.

Vijaykumar Dudhale

Satara, 14 July : भारतीय जनता पक्षाचे विधान परिषदेचे नवनिर्वाचित आमदार धैर्यशील कदम यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील यांच्या वाई मतदारसंघात जाऊन सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेच्या निवडणुकीचे रणशिंग फुंकले आहे. बॅंक ताब्यात घेण्यासाठी भाजप ही निवडणूक ताकदीने लढवेल, असे जाहीर केले आहे, त्यामुळे तालुक्यात महायुतीमध्ये म्हणजे राष्ट्रवादी आणि भाजपत पुन्हा एकदा सामना रंगण्याची चिन्हे आहेत.

आमदार धैर्यशील कदम यांच्याकडे वाई आणि पाटण विधानसभा मतदारसंघाची जबाबदारी देण्यात आली आहे. त्यानुसार आमदार कदम यांनी वाई येथे जाऊन भाजप पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या बैठक घेतली. त्या बैठकीत त्यांनी सातारा जिल्हा बॅंकेच्या संदर्भात कार्यकर्त्यांना चार्ज करण्याचा प्रयत्न केला आहे.

भाजप सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची निवडणूक संपूर्ण ताकदीने लढवणार आहे. पक्षाकडून अधिकचे ठराव जमा झाल्यास संघटनात्मक ताकदीच्या जोरावर आपण यश मिळवू शकतो. अंतिम निर्णय पक्षपातळीवरून होईल. पण तोपर्यंत आपण तयारी केली पाहिजे, असेही आमदार कदम यांनी सांगितले.

वाई आणि पाटण विधानसभा मतदारसंघाचे पालकत्व भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी माझ्याकडे दिले आहे. पूर्वी ते ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्याकडे होते. आगामी २०२९ च्या निवडणुकीच्या अनुषंगाने पक्ष पातळीय आतापासूनच काम सुरू झाले आहे. भाजप या मतदारसंघात निवडणूक लढवणार आहे, त्यामुळे मी पूर्वी तुमच्यासमोर एक कार्यकर्ता म्हणून येत होतो. आता मात्र पक्षाचा प्रतिनिधी आणि आमदार म्हणून तुमच्याकडे येणार आहे, असेही धैर्यशील कदम यांनी स्पष्ट केले.

धैर्यशील कदम म्हणाले, मतदार निश्चितीचा विशेष कार्यक्रम सध्या मतदासंघात सुरू आहे. या प्रक्रियेमुळे आता कोणत्याही मतदाराचे नाव संपूर्ण राज्यात एकाच ठिकाणी असणार आहे, त्यामुळे आगामी निवडणुकांमध्ये मतदानातील गैरप्रकार टाळता येणार आहेत. बोगस मतदार कमी झाल्यास पुढील निवडणुकांमध्ये उमेदवारांचा विजय अगदी अल्प मताधिक्क्याने होणार आहे, तिथेच खरी कसरत असणार आहे.

वाईचे २२ हजार जण ऐरोलीचे मतदार

नवी मुंबईतील ऐरोली मतदारसंघात वाई मतदारसंघातील सुमारे २२ हजार मतदारांची नोंदणी झालेली आहे. मृत व्यक्ती, लग्न झालेल्या मुली किंवा मुंबईत स्थायिक झालेले मतदार यांची नावे दुबार असल्यास त्यावर आत्ताच हरकती घ्याव्यात, अशी सूचनाही त्यांनी कार्यकर्त्यांना केली.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT