Mohite Patil Audio Clip : ‘त्या’ ऑडिओ क्लिपवर मोहिते पाटलांचे स्पष्टीकरण : ‘माझ्यावर अतिप्रेम असणाऱ्यांचं...’; गोरेंचा पलटवार, ‘कितीही मोठा असला तरी...’

Gore Vs Mohite Patil : धैर्यशील मोहिते पाटील यांनी व्हायरल ऑडिओबाबत स्पष्टीकरण दिल्यानंतर पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी दोषी कितीही मोठा असला तरी त्याच्यावर कारवाई होणार असल्याचे स्पष्ट केले.
Dhairyasheel Mohite Patil-jaykumar Gore
Dhairyasheel Mohite Patil-jaykumar GoreSarkarnama
Published on
Updated on

Solapur, 14 July : माढ्याचे खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांनी माळशिरस पंचायत समितीमधील उपअभियंत्याला शिवीगाळ करत हातपाय तोडण्याची धमकी दिल्याची ऑडिओ क्लिप व्हायरल झाली होती. त्याबाबत मोहिते पाटील यांनी स्पष्टीकरण देताना ‘माझ्यावर अतिप्रेम असणाऱ्यांना मी कुठं ना कुठे सापडावा, अशी अपेक्षा असते’ असे म्हटले आहे. त्यावर पालकमंत्री जयकुमार गोरेंनी पलटवार करताना दोषी कितीही मोठा असला तरी त्याच्यावर कारवाई होणार, असा इशारा दिला आहे.

खासदार धैर्यशील मोहिते पाटील म्हणाले, माझ्या राजकारणाची सुरुवात ही १९९९ पासून झाली आहे. अकलूजचा उपसरपंच, सरपंच आणि त्यानंतर माळशिरस पंचायत समिती सदस्य, सभापती, सोलापूर जिल्हा परिषद सदस्य अशा विविध पदांवर मी काम केलेले आहे. सत्ता असो किंवा नसो आजतागायत सर्वच अधिकाऱ्यांशी मी आदरानेच बोललो आहे, यापुढेही बोलत राहणार आहे.

माळशिरस पंचायत समितीच्या उपअभियंता दिलेल्या धमकीची ऑडिओ क्लिप ही तंत्रज्ञानाच्या आधारे बनविण्यात आलेली आहे. माझ्यावर अतिप्रेम असणाऱ्या लोकांना मी कुठं ना कुठे सापडावा, ही कायम अपेक्षा राहते, असा टोलाही त्यांनी पालकमंत्री आणि विरोधकांना लगावला.

दरम्यान धैर्यशील मोहिते पाटील यांच्या ऑडिओ क्लिपवर पालकमंत्री जयकुमार गोरे यांनीही प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले, ऑडिओ क्लिपबाबत खासदार शंका व्यक्त करत असले तरी ते आणि त्यांचे समर्थक सोशल मीडियातून ‘मोहिते पाटील पॅटर्न कसा आहे. नीट सांगितलं आणि ऐकलं नाही तर आम्ही कसं सांगतो’ याचं उदाहरण देताना दिसत आहेत. त्यामुळे त्याचं वास्तव तपासावं लागेल.

Dhairyasheel Mohite Patil-jaykumar Gore
Mohite Patil : मोहिते पाटलांचे फलटण, माणकडे विशेष लक्ष : सोलापूर DPC ला दांडी मारणाऱ्या धैर्यशील यांची साताऱ्यात आवर्जून हजेरी

वेळ पडली खासदारांच्या आवाजाचे नमुनेही घेतले जातील. त्याची पडताळणी करून चौकशी केली जाईल. कुणाच्या मोबाईलवरून फोन आलेला आहे. त्याच्यात छेडछाड झालेली आहे की नाही? ह्या तपासणीसाठी खूप मोठी यंत्रणा पोलिस दलाकडे आहे. त्यामुळे त्या ऑडिओ क्लिपची व्यवस्थित तपासणी होईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

Dhairyasheel Mohite Patil-jaykumar Gore
Collector Order To BLO : बीएलओंना जिल्हाधिकाऱ्यांची सक्त ताकीद : ‘मतदारांना तुमच्याकडे बोलावू नका; तुम्ही त्यांच्या घरी जा’

माळशिरस पंचायत समित्याच्या उपअभियंत्याला कोणी कोंडलं, त्याला कोणी बोलावलं, कोणी मारहाण केली, हे सर्व संबंधित कर्मचाऱ्याला तरी माहिती असेल ना? त्यामुळे या ऑडिओ क्लिपची चौकशी होईल. जो कोणी दोषी असेल त्याच्यावर कारवाई होईल. मग तो कितीही मोठा असला तरी त्याच्यावर कारवाई होईल. पण जो दोषी नाही, त्याने स्पष्टीकरण द्यायचं कारण नाही, असे सांगून मोहिते पाटील यांना टोला लगावला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com