Kolahapur News : स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कोल्हापुरातील भाजपमधील अंतर्गत धुसफूस कोणत्या ना कोणत्या कारणाने समोर येत आहे. त्याचे प्रमुख कारण म्हणजे जुन्या आणि नव्या पदाधिकाऱ्यांना देण्यात येणारा मानअपमान आहे. अशातच आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीसाठी भाजपकडून जिल्ह्यातील कोणत्या नेत्याची वर्णी प्रभारी पदावर लागणार याकडे भाजप कार्यकर्त्यांचे लक्ष लागून राहिले होते.
भाजपकडून (BJP) बुधवारी राज्यातील सर्व जिल्ह्यातील महापालिका जिल्हा परिषद नगरपालिकांच्या प्रभारी यांची नियुक्ती यादी जाहीर केली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यसभेचे खासदार धनंजय महाडिक यांच्यावर विश्वास दाखवला आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील जिल्हा परिषद, महानगरपालिका, नगरपंचायत, नगरपरिषदांच्या निवडणुकांची प्रभारी पदाची जबाबदारी खासदार महाडिक यांच्यावर सोपवली आहे.
गेल्या काही दिवसांपासून महापालिका क्षेत्रात भाजप कार्यकर्त्यांमध्ये नाराजीचा सूर होता. मात्र, राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या दौऱ्यानंतर अधिक कार्यकर्त्यांच्या समजूतीनंतर भाजपने या निवडणुकांमध्ये आघाडी घेतली आहे. गेल्या काही दिवसांमध्ये अनेकांचा प्रक्ष प्रवेश झाला असून पुढील आठवड्याच्या दर मंगळवारी एकाचा पक्षप्रवेश होईल, असा दावा थेट मंत्री चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी केला आहे.
त्यानुसार आगामी काळात कोल्हापूर महानगरपालिकेसह जिल्हा परिषदेमध्ये प्रमुख धोरणात्मक निर्णय घेण्यामागे महत्त्वाची भूमिका खासदार महाडिक यांची असणार आहे. इतकेच नव्हे तर पदाधिकारी आणि वरिष्ठ नेते यांच्यातील दुवा खासदार महाडिक असणार आहेत.
महाडिक गटाला मिळणार बळ
2014 च्या विधानसभा निवडणुकीनंतर महाडिक गटाला जिल्ह्यात उतरती कळा लागली होती. 2019 च्या लोकसभेनंतर विधानसभा निवडणूक गोकुळ दूध संघ हातातून निसटल्याने महाडिक गटाची अवस्था दयनीय होती. मात्र, भाजपमध्ये पक्षप्रवेश केल्यानंतर आणि राज्यसभेला खासदार झाल्यानंतर महाडिक गट पूर्णपणे भाजपमध्ये सक्रिय झाला आहे. अशा परिस्थितीत पुन्हा निवडणुकीच्या तोंडावर प्रभारी नियुक्ती करण्यात आल्याने पुन्हा एकदा कार्यकर्त्यांना अच्छे दिन येणार आहेत.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.