Uddhav Thackeray Video : 'त्या' चर्चांमधील उद्धव ठाकरेंनी हवाच काढली; एकनाथ शिंदेंसोबत युतीबाबत स्पष्ट संदेश, म्हणाले 'निवडणुकीनंतरही...'

Maharashtra Politics Uddhav Thackeray Eknath Shinde : स्थानिक पातळीवर उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदेंची शिवेसना एकत्र येईल, अशी चर्चा होती. मात्र, या चर्चांमध्ये उद्धव ठाकरेंनी आपल्या कार्यकर्त्यांना स्पष्ट संदेश देताना युतीबाबत मोठे भाष्य केले आहे.
Uddhav-Thackeray-Eknath-Shinde
Uddhav-Thackeray-Eknath-ShindeSarkarnama
Published on
Updated on

Shivsena Politics: स्थानिक स्वराज निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील नगरपरिषद आणि नगरपालिका निवडणुकीते रणशिंग फुंकले आहे. महायुती आणि महाविकास आघाडी कायम राहणार की नाही याची चर्चा सुरू असताना.

एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरेंची शिवसेना स्थानिक पातळीवर एकत्र येईल, अशी दबक्या आवाजात चर्चा होती. काही ठिकाणी भाजप आणि राष्ट्रवादीकडून शिवसेनेला कोंडीत पकडण्यात येत असल्याने ही चर्चा होती.

दरम्यान, उद्धव ठाकरेंनी यांनी या चर्चांमधील हवाच काढून घेत कार्यकर्त्यांना स्पष्ट संदेश दिला. ते म्हणाले, कुठल्याही परिस्थितीमध्ये एकनाथ शिंदेंच्यासोबत युती नाही. निवडणुकीच्या आधी आणि निवडणुकीच्यानंतर देखील एकनाथ शिंदेसोबत युती करू नका, असा संदेश त्यांनी कार्यकर्त्यांना दिला आहे.

निवडणुकीत तरुणांना संधी द्या, ताकदीने आणि विश्वासाने लढा, असे आवाहन त्यांनी कार्यकर्त्यांना केले आहे. महाविकास आघाडी म्हणूनच लढा. जास्तीत जास्त जागा स्वतःकडे ठेवा, असे देखील ठाकरेंनी कार्यकर्त्यांना सांगितले आहे.

Uddhav-Thackeray-Eknath-Shinde
Ambarnath Politics : एकनाथ शिंदेंना बालेकिल्ल्यातच अडवण्यासाठी भाजपची 'फिल्डिंग'; निवडणूक जाहीर होताच स्वबळाचा नारा!

उद्धव ठाकरे 'अ‍ॅक्शन मोड'वर

विधानसभेतील परावभानंतर उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेसाठी ही स्थानिक स्वराज संस्था निवडणूक अस्तित्वाचा प्रश्न आहे. त्यामुळे भाजपला रोखण्यासाठी त्यांनी रणनीती तयार केली आहे.

मनसेसोबत मुंबईमध्ये त्यांची उद्धव ठाकरेंची युती होणार हे निश्चित मानले जात आहे. मात्र,मुंबईच्या बाहेर महाविकास आघाडी कायम राहावी, यासाठी देखील प्रयत्न केले जात असल्याची माहिती आहे. तर, महाविकास आघाडीत मनसेला घेण्यास काँग्रेसचा विरोध असल्याची चर्चा आहे.

Uddhav-Thackeray-Eknath-Shinde
MLA Internal Conflict Jalgaon : भाजप एकनाथ शिंदेंच्या आमदाराचा 'करेक्ट कार्यक्रम' करणार; वाद विकोपाला, एकेरी उल्लेख करत मंगेश चव्हाणांनी पाटलांच्या विरोधात दंड थोपटले!

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com