Vivek Kolhe Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Jayakwadi Water Issue : पश्चिमेचे पाणी पूर्वेकडे वळवा; विवेक कोल्हेंचा जायकवाडी संघर्षावर पर्याय!

राजेंद्र त्रिमुखे

Ahmednagar Political News : नगर-नाशिक जिल्ह्यातील धरण समूहातील आठ टीएमसी पाणी जायकवाडीला देण्यावरून नगर-नाशिकविरुद्ध मराठवाडा असा संघर्ष सुरू झाला आहे. या वादावर तोडगा काढण्यासाठी औरंगाबाद खंडपीठात तीन याचिका दाखल झालेल्या आहेत. त्यामुळे जायकवाडी अजून पाणी सोडण्यात आलेले नाही. एकंदरीत पाणी प्रश्नावरून निर्माण झालेला संघर्षावर आरोप-प्रत्यारोप सुरू झालेली आहे. या पाणीवाटपाच्या वादावर भाजप नेते विवेक कोल्हेंनी एक पर्याय सूचवला आहे. सध्या त्याचीच चर्चा सुरू झाली आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

चौंडी येथे आमदार राम शिंदे यांनी आयोजित केलेल्या दिवाळी फराळ कार्यक्रमाला विवेक कोल्हे उपस्थित होते. यावेळी त्यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना महसूलमंत्री राधाकृष्ण विखे यांच्या उपस्थितीत झालेल्या कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत झालेल्या चर्चेवर भाष्य केले. यावेळी त्यांनी समन्यायी पाणीवाटप धोरण कायद्याने जायकवाडी धरण्यात सोडण्यात येणाऱ्या पाण्याला पर्याय दिला आहे.

विवेक कोल्हे म्हणाले, 'जायकवाडीचा पाणी प्रश्न हा प्रादेशिक वाद करून संघर्षातून सुटणारा नाही. पश्चिमेचे पाणी पूर्वेला गोदावरी खोऱ्यात वळवून सुटणारा आहे. जवळपास शंभर ते दीडशे टीएमसी पाणी समुद्रात जाते. यातील ५० टक्के पाणी गोदावरी खोऱ्यात वळवता आले तरी प्रश्न सुटणार आहे. यासाठी आवश्यक असलेल्या निधीसाठी भरीव तरतूद गरजेची आहे. यावर हिवाळी अधिवेशनात चर्चा घडवून आणली पाहिजे,' असे कोल्हेंनी ठामपणे सांगितले.

गणेश साखर कारखान्याच्या निवडणुकीमुळे विवेक कोल्हे चर्चेत आले आहेत. भाजपात असताना त्यांनी काँग्रेसच्या बाळासाहेब थोरातांना सोबत घेत राधाकृष्ण विखे विरोधात लढले. या त्यांनी एकतर्फी निवडणूक जिंकली. दरम्यान राहता तालुक्यातील चार मोठ्या लोकसंख्येच्या ग्रामपंचायती, सोसायट्या कोल्हे गटाने विखेंना पराभूत करत आपल्याकडे खेचून आणल्या आहेत. या पार्श्वभूमीवर आता विवेक कोल्हे यांनी शिर्डीतून येणारी विधानसभा राधाकृष्ण विखे यांच्या विरोधात लढावी, असा आग्रह समर्थक करत आहेत.

(Edited by Sunil Dhumal)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT