Mumbai Political News : राज्यातील महामार्गांवरील खड्डे आणि टोलविरोधात मनसेने काही दिवसांपूर्वी रान पेटवले होते. गोवा मार्गावर आंदोलन केल्यानंतर राज्यातील टोल दरवाढीविरोधात मनसे पक्षप्रमुख राज ठाकरेंनी सरकारला इशारा दिला होता. यानंतर न्यायालयाचे आभार मानून ठाकरेंनी पुन्हा आम्हाला हात पाय हलवायला लागतील, असा इशारा दिला आहे.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
यापूर्वी मनसेने टोल आणि खराब रस्त्यांच्या मुद्द्यावरून सरकारला धारेवर धरले होते. त्यातच काही दिवसांपासून राज्यात मराठा, ओबीसी, धनगर, आदिवासी आणि इतर समाजाने आरक्षणासाठी आक्रमक पवित्रा घेतलेला आहे. अशा स्थितीत राज ठाकरे यांनी पुन्हा एकदा हात पाय हलवण्याची भाषा केल्याने राज्यातील राजकीय वातावरण निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तापण्याची शक्यता आहे.
ठाण्यातील मनसे कार्यालयात ठाकरे प्रसारमाध्यमांशी बोलत होते. त्यावेळी मराठी पाट्याबाबत दिलेल्या निर्णयावर न्यायालयाचे आभार मानले. मात्र त्याची अंमलबजावणी होत नसल्याने सरकारलाही इशारा दिला, तर न्यायालयाचा अवमान होत असल्याची खंतही त्यांनी व्यक्त केली. ते म्हणाले, 'न्यायालयाचे निर्णयही चित्रविचित्र असतात. फटाके कधी लावायचे, सण कसे साजरे करायचे हे न्यायालय ठरवणार. मात्र न्यायालयाचे आदेश पाळले जात नाही, त्याकडे लक्ष देणार नाही.' (Latest Political News)
ठाकरे म्हणाले, 'मराठी पाट्यांसाठी आंदोलने झाली, त्या मराठी पाट्यांच्या विरोधात येथील व्यापारी न्यायालयात जातात. महाराष्ट्रात राहणारे, महाराष्ट्र ज्यांना पोसतोय ते व्यापारी न्यायालयात जातात. सर्वोच्च न्यायालयाने मात्र प्रादेशिक भाषांमध्ये दुकानांच्या पाट्या असाव्यात, असे आदेश दिले. असे असतानाही सरकारकडून त्याची अंमलबजावणी होत नाही. त्यामुळे कदाचित आम्हालाच पुन्हा हात-पाय हलवावे लागतील,' असा थेट इशारा ठाकरेंनी सरकारला दिला आहे.
(Edited by Sunil Dhumal)
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.