Ganesh Sugar Factory : अहमदनगरमधील गणेश सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीची राज्यभरात चर्चा झाली. कारण, गणेश सहकारी साखर कारखान्यावर गेल्या आठ वर्षांपासून महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील (RadhaKrishna Vikhe Patil) यांची सत्ता होती. ही सत्ता माजी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) आणि युवा नेते विवेक कोल्हे यांनी एकत्र येत हिसकावून घेतली. या निवडणुकीमध्ये किंगमेकर ठरलेले विवेक कोल्हे कोण? अशी चर्चा रंगली आहे.
थोरात-कोल्हेंच्या पॅनेलने १८ जागांवर मुसंडी मारली. यंदाच्या निवडणुकीत विखेंचे कट्टर विरोधक असलेले काँग्रेस (Congress) नेते बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) यांनी भाजपच्या (BJP) विवेक कोल्हेंना सोबत घेऊन पॅनल उभा केला होता. यामुळे विखे पिता पुत्रांची डोकेदुखी वाढली होती. विखे यांना घाम फोडून थोरातांना विवेक कोल्हे यांनी साथ दिली.
विवेक बिपिन कोल्हे हे माजी मंत्री स्व. शंकरराव कोल्हे यांचे नातू आहेत. तसेच कोपरगाव विधानसभा मतदार संघाच्या भाजपच्या माजी आमदार स्नेहलता कोल्हे यांचे चिरंजीव आहेत. तसेच अहमदनगर जिल्हा सहकारी बँकेचे विद्यमान संचालक आहेत. त्याचबरोबर विविध ८ ते १० सहकारी संस्थांवर सदस्य आहेत.
कोल्हे यांनी बीई सिव्हील पदवी प्राप्त केलेली आहे. २०१७ मध्ये त्यांची संजीवनी सहकारी साखर कारखान्यात तज्ञ संचालक म्हणून निवड झाली होती. विवेक यांनी आपले आजोबा स्व. शंकरराव कोल्हे यांच्या प्रमाणेच तरुणांची संघटन बांधणी करत संजीवनी युवा प्रतिष्ठानची स्थापना केली आहे. गणेश कारखान्याच्या निवडणुकीत मेहनत घेत त्यांनी विखेंच्या पॅनलचा पराभव केला. त्यामुळे त्यांच्या नावाची चर्चा राज्यभरात झाली.
या निवडणुकीनंतर बोलताना विवेक कोल्हे म्हणाले, गणेश कारखान्याच्या सभासदांनी दिलेला कौल मी आजोबा माजी मंत्री (कै.) शंकरराव कोल्हे यांच्या स्मृतीला समर्पित करतो. या निकालामुळे कार्यकर्ते आणि सभासदांच्या अपेक्षा वाढल्या आहेत. गणेश कारखाना चांगला चालवून आपण या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी सभासदांना सोबत घेऊन पुढाकार घेऊ.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.