Satara, 01 March : सातारा जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने सर्वाधिक 27 जागा जिंकल्या असून सत्ता स्थापन करण्यासाठी त्यांना आणखी सहा जागांची गरज आहे. बहुमत नसतानाही झेडपी अध्यक्ष भाजपचाच होईल, अशी घोषणा ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरेंनी केली आहे. आज सोलापूर दौऱ्यावर आलेल्या गोरेंनी त्याचा पुनरुच्चार करत त्यासाठी लावलेली फिल्डिंग आणि इनसाईड स्टोरीही सांगितली आहे.
सातारा (Satara) जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत एकूण ६५ जागांपैकी भाजपने २७, राष्ट्रवादी काँग्रेसने २०, शिवसेनेने १५, तर काँग्रेस, स्वाभिमानी शेतकरी संघटना आणि अपक्ष यांनी प्रत्येकी एक जागा जिंकली आहे. अपक्ष उमेदवार भाजपला पाठिंबा देऊ शकतो. मात्र, काँग्रेस आणि स्वाभिमानीचा उमेदवार राष्ट्रवादीच्या पाठिंब्यावर निवडून आले आहेत. भाजपने स्वबळावर लढताना मित्रपक्षांना नामोहरम करण्याचा प्रयत्न केला होता. त्यामुळे राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या भूमिकेवर इथले गणित अवलंबून असणार आहे.
बहुमतापर्यंत भाजप पोचू शकत नसताना ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरेंनी (Jaykumar Gore) जिल्हा परिषद-पंचायत समिती सदस्यांचा सत्कार समारंभात सातारा झेडपीचा अध्यक्ष भाजपचाच होईल, असे जाहीर केले होते. त्याचा पुनरुच्चार आज गोरेंनी पुन्हा एकदा केला आहे. त्यासोबतच भाजपचा अध्यक्ष करण्यासाठी पउद्यामागून सुरू असलेल्या घडामोडींवरही त्यांनी सूचक भाष्य केले आहे.
गोरे म्हणाले, सातारा जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत आम्ही कमी पडलो आहोत, हे आम्ही मोठ्या मनाने स्वीकारतो. आजपर्यंतच्या इतिहासात सगळ्यात चांगला निकाल आमच्यासाठी आलेला आहे. जवळपास २८ जागा भाजपकडे आहेत. सत्तेसाठी जवळपास सहा ते सात जागा आमच्याकडे कमी आहेत, याची जाणीव आम्हाला आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पातळीवरून सातारा जिल्हा परिषदेत महायुती म्हणून सत्ता स्थापन करण्याचा आमचा प्रयत्न सुरू आहे. आम्ही निवडणुकीत जरी एकमेकांच्या विरोधात लढलो तरी निकालानंतर महायुती म्हणून एकत्र येऊन काम करावं, अशी आमची भावना आहे. त्या भावनेतून आम्ही काम करत आहोत, असेही गोरेंनी स्पष्ट केले.
मी पहिल्या दिवसांपासून सांगत आलो आहे की, सातारा जिल्हा परिषदेचा अध्यक्ष भाजपचा होईल. यामध्ये कोणतीही शंका घेण्याचे कारण नाही. त्यामुळे काय घडामोडी घडत आहेत. काय चाललंय, यावर आमचं, मुख्यमंत्री फडणवीस यांचं बारकाईनं लक्ष आहे. आम्ही सगळ्यात मोठा पक्ष आहोत, त्यामुळे भाजपचा अध्यक्ष झाला पाहिजे, ही आमची भूमिका आज, उद्या आणि परवाही कायम राहील, असे सांगून गोरेंनी मित्रपक्षांना इशारा दिल्याचे मानले जात आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.