Satara ZP : भाजपला दे धक्का : सातारा ZPत राष्ट्रवादी-शिवसेनेचीच सत्ता, ‘कुणीही कितीही गप्पा मारू द्या, अध्यक्ष घड्याळाचाच...’

NCP District President's Statement : सातारा झेडपीत राष्ट्रवादी–शिवसेना आघाडीचे संकेत. बाळासाहेब सोळसकर यांनी अध्यक्षपद ‘घड्याळा’कडेच जाणार असल्याचा दावा केला. भाजपला धक्का बसण्याची शक्यता. जिल्ह्यातील सत्तासमीकरण स्पष्ट झाले.
Shambhuraj Desai-Makrand Patil
Shambhuraj Desai-Makrand PatilSarkarnama
Published on
Updated on

Satara, 27 February : जिल्हा परिषद निवडणुकीत राज्यात सर्वाधिक चर्चेत असलेल्या सातारा झेडपीचे सत्ता समीकरण अखेर ठरलं आहे. साताऱ्यामध्ये भारतीय जनता पक्षाला मोठा धक्का बसणार आहे. कारण जिल्हा परिषदेमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेचीच सत्ता येणार असल्याचे स्पष्ट संकेत राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब सोळसकर यांनी दिले आहेत. कुणी कितीही गप्पा मारू द्या, झेडपीचा अध्यक्ष घड्याळाचाच होणार, असे आवाहन त्यांनी दिले आहे.

सातारा जिल्हा परिषदेच्या (Satara Zilla Parishad) निवडणुकीत महायुतीलमधील भाजपने स्वबळावर निवडणूक लढवली होती, तर राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेने एकत्र येऊन निवडणूक लढवली होती. त्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने सर्वाधिक २७ जागा जिंकल्या आहेत. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसने २०, तर शिवसेनेने १५ जागा जिंकल्या आहेत. याशिवाय काँग्रेस, स्वाभिमानी शेतकरी संघटना आणि अपक्ष यांनी प्रत्येकी एका जागेवर विजय मिळविला आहे.

साताऱ्यात कोणत्याही एका पक्षाला बहुमत मिळालेले नाही. त्यातच भाजपने दोन्ही मित्रपक्षांवर जोरदार हल्ला चढवला होता, त्यामुळे शिवसेना (Shivsena) आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) नेते कमालीचे दुखावले आहेत. त्यामुळे निकाल जाहीर होऊन वीस दिवस होत आले तरी सत्ता स्थापनेचा तिढा अजूनही सुटू शकलेला नाही.

निवडणूक पूर्व आघाडी करून लढलेले शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसकडे बहुमत आहे. मात्र, त्यांनी आजपर्यंत सत्ता स्थापनेचा दावा केलेला नाही, त्यामुळे महायुतीमध्ये काय सुरू आहे, असा प्रश्न उपस्थित होत आहे. मात्र, त्यावर आता राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब सोळसकर यांनी गौप्यस्फोट केला आहे.

भारतीय जनता पक्षाला सत्तेपासून दूर ठेवून शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता जिल्हा परिषदेमध्ये येण्याचे स्पष्ट संकेत दिले आहेत. सोळसकर म्हणाले, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे २० जिल्हा परिषद सदस्य आहेत आणि दोन राष्ट्रवादीच्या पाठिंब्यावर निवडून आलेले सदस्य आहेत. हे २२ सदस्य आज एकत्रितपणाने आहेत.

सातारा जिल्हा परिषदेत उद्या घड्याळाचा अध्यक्ष होणार, एवढा शब्द तुम्हा सर्वांना देतो. त्यात कुठलीही अडचण येणार नाही. कुणी काहीही आणि कितीही गप्पा मारू द्या. पालकमंत्री शंभूराज देसाई आणि मंत्री मकरंद आबा पाटील हे एका ताकदीने आणि एका जीवाने एकत्रिपणाने काम करत आहेत. आमच्या दोघांचं संख्याबळ बघितलं तर ते ३७ ते ३८ पर्यंत जातंय. त्यामुळे झेडपी, पंचायत समितीच्या सत्तेला कोणतीही अडचण येणार नाही, असे सोळसकर यांनी स्पष्ट केले.

ते म्हणाले, टीव्हीवर कोण काय बोलत असेल, तर कोण काय म्हणत असेल तर ठीक आहे, तो ज्याचा त्याचा अधिकार आहे. काय बोलावं याचा प्रत्येकाला लोकशाहीत अधिकार आहे. पण जी वस्तुस्थिती आहे, ज्या चर्चेत मी सातत्याने आहे, त्यावरून मी ह्या गोष्टी घडणार, हे मी निश्चितपणे सांगतो.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com