Vishal Patil : चंद्रकांतदादांना नकार देणारे खासदार विशाल पाटील हे विखे पाटलांची ऑफर स्वीकारणार का?

Radhakrishna Vikhe Patil's BJP Entry Offer : सांगली लोकसभा पराभवानंतर भाजपकडून अपक्ष खासदार विशाल पाटील यांना पक्षप्रवेशासाठी प्रयत्न सुरू आहेत. चंद्रकांत पाटील आणि राधाकृष्ण विखे पाटील यांच्या ऑफरकडे सांगलीत राजकीय उत्सुकता वाढली आहे.
Vishal Patil-Radhakrishna Vikhe Patil
Vishal Patil-Radhakrishna Vikhe PatilSarkarnama
Published on
Updated on

Sangli, 01 March : लोकसभा निवडणुकीत सांगली मतदारसंंघात झालेला पराभव भाजप नेत्याच्या चांगलाच जिव्हारी लागलेला आहे. त्यातूनच सांगलीतून अपक्ष निवडून आलेले खासदार विशाल पाटील यांना भाजप नेत्यांकडून पक्षप्रवेशाची वारंवार ऑफर दिली जात आहे. राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी गेल्या वर्षी दोन महिन्यांत दोनदा भाजपत प्रवेश करण्याचे निमंत्रण दिले होते. चंद्रकांतदादांच्या विनंतीला न बधलेल्या विशाल पाटलांसाठी आता जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी पायघड्या घातल्या आहेत. चंद्रकांतदादांना नकार देणारे खासदार पाटील विखे पाटलांचं आवताण स्वीकारणार का, याकडे सांगलीच्या राजकीय वर्तुळाचे लक्ष असणार आहे.

राधाकृष्ण विखे पाटील हे सांगली जिल्ह्यातील जत विधानसभा मतदारसंघातील म्हैसाळ विस्तारित जतमधील ‘बोगदा ब्रेक-थ्रू’ कामाचा शुभारंभ जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांच्या हस्ते करण्यात आला आहे. त्या कार्यक्रमाला विखे पाटील, खासदार विशाल पाटील, आमदार गोपीचंद पडळकर, सदाभाऊ खोत हे उपस्थित होते. त्या कार्यक्रमात विखे पाटील यांनी विशाल पाटील यांना भाजप प्रवेशाची ऑफर दिली.

विखे पाटील म्हणाले, आपल्या सांगलीचे खासदार विशाल पाटील हे तरुण आहेत. त्यांचे आजोबा, वडिल असं आमचं अनेक पिढ्याचं नातं आहे. मी त्यांच्यावर टीका करतोय, असं त्यांनी वाटून घेऊ नये.

तुम्ही अजून तरुण आहात. या लोकांचे छक्के पंजे तुम्हाला अजून माहिती नाहीत. वसंतदादांचा विश्वासघात कोणी केला, हे सगळं लोकांना माहिती आहे. त्यामुळे तुम्ही त्या फंदात पडण्यापेक्षा तुम्ही सुद्धा आता या विकासाच्या प्रक्रियेमध्ये स्वतःला सामावून घ्या. असं माझं तुम्हाला सांगणं आहे, असेही विखे पाटील यांनी स्पष्ट केले.

Vishal Patil-Radhakrishna Vikhe Patil
Sangli ZP President Election : सांगली जिल्हा परिषदेमध्ये मोठा ट्विस्ट, राष्ट्रवादीच्या नवीन अटीने भाजप चिंतेत; जयंत पाटलांना संधी?

विशाल पाटील यांच्या भाजप प्रवेशाला स्टेजवरील सर्व लोकं सहमत असतील असं सांगून विखे पाटील यांनी आहात ना सदाभाऊ, पृथ्वीराजभाऊ म्हणत त्यांची साक्ष काढली. विशाल पाटील हे युवक नेतृत्व आहे. पण, प्रवेशाबाबतचा निर्णय पक्षश्रेष्ठी घेत असतात. आज सगळा सांगली जिल्हा भाजपमय झाला आहे, त्यामुळे आमच्या या प्रवाहामध्ये खासदार विशाल पाटील आले तर त्यांचे स्वागतच आहे, असेही विखे पाटील यांनी स्पष्ट केले.

Vishal Patil-Radhakrishna Vikhe Patil
ZP Election : उमेदवारांनो...ZP, पंचायत समितीला किती खर्च केला? 10 मार्चपर्यंत माहिती द्या; अन्यथा 6 वर्षे निवडणुकीस मुकाल!

दरम्यान, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री तथा पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी मागील वर्षी मार्च आणि एप्रिल महिन्यांत दोन वेळा भाजप प्रवेशाचे निमंत्रण दिले होते. पण विशाल पाटलांनी त्यांना दाद लागून दिली नव्हती. त्यानंतर पुलाखालून बरेच पाणी वाहून गेले आहे. विधानसभा निवडणुकीत दणदणीत बहुमत मिळविलेल्या महायुतीने नगरपरिषद, महापालिका, जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीतही यश मिळविले आहे, त्यामुळे विखे पाटलांची ऑफर विशाल पाटील स्वीकारणार का, याकडे सर्वांचे लक्ष असणार आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com