Praniti Shinde Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Praniti Shinde Vs BJP : भाजपवाले आता माझं चारित्र्यहनन करतील; प्रणिती शिंदेंचा गंभीर आरोप

Solapur Lok Sabha Constituency election 2024 : चुकीची माहिती, चुकीचे फोटो टाकून विरोधक चारित्र्यहनन करण्याची शक्यता आहे. त्यातून निवडणुकीला वेगळ्या वळणावर घेऊन जाण्याचा त्यांचा प्रयत्न आहे.

विश्वभूषण लिमये

Solapur, 1 April : आगामी 30 ते 35 दिवसांत विरोधक हे सोशल मीडियाच्या माध्यमातून वैयक्तिक माझ्यावर आणि माझ्या कुटुंबीयांवर चुकीचे फोटो, चुकीची माहिती टाकून चारित्र्यहनन करण्याची शक्यता आहे, असा गंभीर आरोप आमदार प्रणिती शिंदे यांनी भाजपवर केला.

सोलापूर येथे माध्यमांशी बोलताना लोकसभेच्या उमेदवार प्रणिती शिंदे (Praniti Shinde) यांनी ही भीती व्यक्त करून भाजपवर गंभीर आरोप केला. शिंदे म्हणाल्या, विरोधक हे सुशीलकुमार शिंदे यांच्यावर खोटेनाटे आरोप करत आहेत. मी उमेदवार आहे, माझ्याबद्दल बोला. पण, माझ्या वडिलांवर बोलले जात आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

प्रणिती शिंदे म्हणाल्या, निवडणुकीला एक वेगळं वळण देण्याचा प्रयत्न होत आहे. चुकीची माहिती, चुकीचे फोटो टाकून विरोधक चारित्र्यहनन करण्याची शक्यता आहे. त्यातून निवडणुकीला वेगळ्या वळणावर घेऊन जाण्याचा त्यांचा प्रयत्न आहे.

ते 10 वर्ष सत्तेत होते, त्यांच्याकडे पुरावे होते, तर कारवाई करायला पाहिजे होती, मग त्यांनी कारवाई का केली नाही...? असा सवाल आमदार प्रणिती शिंदे यांनी पोटासंदर्भात झालेल्या आरोपाबाबत बोलताना केला.

सोशल मीडियावर काही दिवसांपासून विरोधक म्हणत आहेत की आता रामराज्य येणार आहे. म्हणजे ते पावती देत आहेत का, की मागच्या 10 वर्षांत सोलापुरात 'रावणराज्य' होतं, असा टोलाही प्रणिती यांनी भाजपच्या लोकांना लगावला.

भाजपने आपल्या देशाला धर्माची आणि जातीची कीड लावली

आपल्या देशाला भाजपच्या विचारसरणीने धर्माची आणि जातीची कीड लावली आहे. धर्म-जातं करून लोकांमध्ये तेढ निर्माण करतायत, आधी आपण असे नव्हतो. निवडणुकीच्या वेळेस आपण सर्वधर्म समभावावर मतदान करायचो. सर्वधर्म समभाव विचारसरणी असणाऱ्या लोकांना धर्मावर मतदान करायला हे प्रवृत्त करताय. ज्या दिवशी असं व्हायला लागेल, त्यादिवशी लोकशाहीला खतरा निर्माण व्हायला लागतो. म्हणून जागे व्हा, ते फक्त गाजर दाखवत आहेत, असा हल्लाबोल प्रणिती शिंदे यांनी केला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT