VBA Candidate : सोलापूर, माढ्यातील ‘वंचित’च्या उमेदवारीचा फायदा कुणाला...? तोटा कोणाचा...?

Lok Sabha Election 2024 : वंचित बहुजन आघाडीने सोलापूरमधून राहुल गायकवाड यांना, तर माढ्यातून मोहोळचे माजी नगराध्यक्ष तथा राष्ट्रवादीचे पदाधिकारी रमेश बारसकर यांना उमेदवारी जाहीर केली आहे. बारसकर यांच्या तुलनेत सोलापूरचे राहुल गायकवाड अगदीच नवखे वाटतात. त्यामुळे सोलापूरमधून गायकवाड हे किती मते घेतात, हे पाहावे लागणार आहे.
Ramesh Baraskar- Rahul Gaikwad-Praniti Shinde-Ram Satpute-Ranjitshinh Naik Nimbalkar
Ramesh Baraskar- Rahul Gaikwad-Praniti Shinde-Ram Satpute-Ranjitshinh Naik NimbalkarSarkarnama

Solapur, 1 April : महाविकास आघाडीबरोबर युती करणार, असे सांगणाऱ्या प्रकाश आंबेडकर यांनी अखेर वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार स्वतंत्रपणे निवडणुकीच्या रिंगणात उतरवले. दुसऱ्या टप्प्यात आंबडेकरांनी सोलापूर आणि माढा लोकसभा मतदारसंघांतील उमेदवार जाहीर केले आहेत. मात्र, माढ्याच्या तुलनेत सोलापूर मतदारसंघातून अगदी नवखा उमेदवार दिला आहे. त्या तुलनेत माढ्याचा उमेदवार उजवा आहे. त्यामुळे सोलापूरच्या वंचितच्या उमेदवाराचा फटका नेमका कुणाला बसणार, असा सवाल उपस्थित होत आहे.

वंचित बहुजन आघाडीने (Vanchit Bahujan Aaghadi) सोलापूरमधून (Solapur) राहुल गायकवाड यांना, तर माढ्यातून (Madha) मोहोळचे माजी नगराध्यक्ष तथा राष्ट्रवादीचे पदाधिकारी रमेश बारसकर यांना उमेदवारी जाहीर केली आहे. बारसकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या संघटनेबरोबरच नगराध्यक्ष म्हणूनही काम केले आहे. तसेच, ते ज्योतीक्रांती परिषदेचे प्रदेशाध्यक्ष, तर राष्ट्रवादीचे प्रदेश चिटणीस होते. त्यामुळे संघटनात्मक कामाबरोबरच त्यांना निवडणुकीचाही अनुभव आहे. मात्र, बारसकर यांच्या तुलनेत सोलापूरचे राहुल गायकवाड अगदीच नवखे वाटतात. त्यामुळे सोलापूरमधून गायकवाड हे किती मते घेतात, हे पाहावे लागणार आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Ramesh Baraskar- Rahul Gaikwad-Praniti Shinde-Ram Satpute-Ranjitshinh Naik Nimbalkar
Solapur News : ‘आम्ही लग्नाळू...’ म्हणत तरुणांचा कलेक्टर कचेरीवर मोर्चा नेणाऱ्या बारसकरांची नवी अफलातून घोषणा...

गेल्या पंचवार्षिक निवडणुकीत सोलापूरमधून खुद्द वंचितचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर लोकसभेच्या (Loksabha Election) रिंगणात उतरले होते. तिरंगी लढतीत त्यांनी जवळपास १ लाख ७० हजार मते घेतली हाेती, तर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे यांचा १ लाख ५७ हजार मतांनी पराभव झाला होता, त्यामुळे ‘वंचित’चे प्रकाश आंबेडकर यांच्या उमेदवारीचा शिंदे यांना फटका बसला होता. त्या तुलनेत राहुल गायकवाड हे अगदी नवीन उमेदवार ठरतात. गायकवाड हे मूळचे अक्कलकोटचे असून, त्यांचे शिक्षण पुण्यात झाले आहे. मात्र, त्यांनी अक्कलकोट-आळंद-गुलबर्गा महामार्गासाठी यशस्वी आंदोलन केल्याचे सांगितले जाते. मात्र, सोलापूरच्या राजकीय क्षेत्रात त्यांचे नाव अभावनेच आलेले असावे.

नवखे असलेल्या ‘वंचित’च्या राहुल गायकवाड यांच्या उमेदवारीचा आमदार प्रणिती शिंदे यांना फटका बसणार का, असा सवाल उपस्थित होत आहे. प्रकाश आंबेडकर यांच्या उमेदवारीचा सुशीलकुमार शिंदे यांना ज्याप्रमाणे फटका बसला, तसा या वेळी काँग्रेसच्या उमेदवार प्रणिती यांना बसणार नाही, अशी शक्यता वर्तविली जात आहे.

Ramesh Baraskar- Rahul Gaikwad-Praniti Shinde-Ram Satpute-Ranjitshinh Naik Nimbalkar
Lok Sabha Election 2024 : एकनाथ शिंदे लोकसभेचा एक उमेदवार बदलणार; तो उमेदवार मराठवाडा की पश्चिम महाराष्ट्रातील?

दुसरीकडे, माढ्यातून मोहोळचे माजी नगराध्यक्ष तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी रमेश बारसकर यांना प्रकाश आंबेडकर यांनी मैदानात उतरवले आहे. बारसकर हे नवनवीन कल्पना राबवण्यासाठी परिचित असून, त्यांनी लग्न न झालेल्या तरुणांच्या समस्येवर सोलापूरच्या जिल्हाधिकारी कार्यालयावर ‘आम्ही लग्नाळू’ म्हणत तरुणांचा मोर्चा काढला होता.

बारसकर यांचे कार्यक्षेत्र हे माढा लोकसभा मतदारसंघाच्या बाहेर आहे, त्यामुळे माढ्यातून ते किती मते घेतात, हे पाहावे लागेल. मागील निवडणुकीत माजी आमदार विजयराव मोरे यांना माढ्यातून आंबेडकर यांनी लोकसभेच्या आखाड्यात उतरविले होते. त्यांनी ५१ हजार मते घेतली होती.

R.

Ramesh Baraskar- Rahul Gaikwad-Praniti Shinde-Ram Satpute-Ranjitshinh Naik Nimbalkar
Nashik Lok Sabha Constituency : नाशकात महायुतीचं ठरलं; छगन भुजबळ भिडणार ठाकरे गटाच्या वाजेंना!

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com