Shashikant Shinde, Devendra Fadanvis sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Satara Political News : भाजपचे 'महाविकास' विरोधातील आंदोलन म्हणजे चोराच्या उलट्या बोंबा...शशिकांत शिंदे

Shashikant Shinde भाजपच्या वतीने आज महाविकास आघाडीच्या निषेधार्थ केलेल्या आंदोलनावरून राष्ट्रवादीचे आमदार शशिकांत शिंदे यांनी टीकेची झोड उठवली.

Umesh Bambare-Patil

Satara Political News : कंत्राट भरती रद्द केल्यानंतर भाजपकडून महाविकास आघाडीच्या विरोधात झालेले आजचे आंदोलन हे चोराच्या उलट्या बोंबा असल्याचा आरोप आमदार शशिकांत शिंदे यांनी केला आहे. कोरोना काळानंतर नोकर भरती प्रक्रियेला विलंब होत असल्याने अकरा महिन्यांसाठी कंत्राटी भरती प्रक्रिया राबवत असल्याचे गृहमंत्र्यांनी विधिमंडळात सांगितले होते. आता त्याचे खापर महाविकास आघाडीवर फोडले जात आहे.

भारतीय जनता पक्षाच्या वतीने Satara BJP आज प्रत्येक जिल्ह्यात महाविकास आघाडीच्या निषेधार्थ आंदोलन करण्यात आले. या आंदोलनावरून राष्ट्रवादीचे आमदार शशिकांत शिंदे Shashikant Shinde यांनी भाजपवर टीकेची झोड उठवली. मागील अधिवेशनात कंत्राटी भरतीचे बिल तुम्हीच मंजूर केले होते, आता का बदलत आहात. हे तुमचे पाप आहे ते दुसऱ्याच्या माथी फोडू नका. तुमच्या पापाचा घडा भरलाय, असेही त्यांनी स्पष्ट केले.

आमदार शशिकांत शिंदे म्हणाले, राज्यात सरकार भाजपचे, गृहमंत्री त्यांचाच, त्यांच्याच सरकारने निर्णय घेतलेला असताना भाजप आंदोलन करतंय ही हस्यास्पद बाब आहे. या बिलाला आम्ही विधिमंडळात विरोध केला होता.

त्यावेळी कोरोना काळातनंतर भरती प्रक्रियेला विलंब लागत असल्याने अकरा महिन्यांसाठी कंत्राटी भरती करतोय, असे गृहमंत्र्यांनी विधिमंडळात सांगितले होते. असे असताना त्यांनी पवारसाहेब व उद्धव ठाकरेंच्या काळात झाले असल्याचे सांगत धडधडीत खोटे बोलत आहेत.

लोकांचा यावर आता विश्वास राहिलेला नाही. प्रत्येक वेळी महाविकास आघाडी जबाबदार असल्याचे सांगत पळवाटा काढण्याचा प्रयत्न भाजपकडून केला जात आहे. जनतेचा रोष पाहून भाजपने आज आंदोलन केले आहे. Maharashtra Political News

ललित पाटील प्रकरणावर शशिकांत शिंदे म्हणाले, तुमच्या कारकिर्दीत माणूस ससूनमधून पळून जातो. त्यांच्या अपयशाचे खापर दुसऱ्यावर फोडायचे आहे. पोलिस भरतीबाबत राज्यातून तीव्र नाराजी होऊ लागल्याने भाजपने हे आंदोलनाचे नाटक केलेले आहे, असेही आमदार शिंदे म्हणाले.

तहसीलदारापासून सर्वच विभागात कंत्राटी पद्धत घेतली आहे. तुम्हीच मागील अधिवेशनात हे बिल मंजूर केले आता का बदलत आहात, असा प्रश्न करून हे तुम्ही केलेले पाप आहे, ते दुसऱ्याच्या माथी फोडू नका, तुमच्या पापाचा घडा भरला आहे, असा इशारा त्यांनी दिला.

Edited By : Umesh Bambare

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT