BJP Assembly elections News : भाजपचा मेगा प्लॅन ठरला ! एकाच दिवशी ४० नेत्यांच्या ४० ठिकाणी सभा

BJP Politics : देशभरातील ८ हजार भाजप कार्यकर्त्यांमधून ३ हजार जणांची निवड केली आहे.
BJP Politics news
BJP Politics news Sarkarnama
Published on
Updated on

New Delhi : कर्नाटक विधानसभेच्या निवडणुकीत सपाटून मार खाल्ल्यानंतर आगामी पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीत भाजपने जोरदार तयारी केली आहे. कर्नाटकात काँग्रेसने भाजपला धूळ चारली होती, कर्नाटकातील अपयशानंतर मध्य प्रदेश, राजस्थान, छत्तीसगड, मिझोराम, तेलंगणा राज्यांच्या विधानसभांच्या निवडणुकीकडे भाजपने लक्ष केंद्रित केले आहे. पाचही राज्य जिंकण्यासाठी भाजपचा मेगा प्लॅन ठरला आहे.

BJP Politics news
Supriya Sule News : फडणवीस गृहमंत्री असताना ललित कसा पळून गेला; सुप्रिया सुळे यांचा सवाल

भाजपकडून ४० नेत्यांच्या स्टार प्रचारकांची यादी केंद्रीय निवडणूक आयोगाकडे सुपूर्त करण्यात आली आहे. या स्टार प्रचारकांमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी, राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा समावेश आहे. प्रचारादरम्यान भाजप एकाच दिवशी ४० नेत्यांच्या ४० ठिकाणी निवडणूक सभा घेणार आहेत. प्रचारासाठी देशभरातील कार्यकर्त्यांची निवड करून भाजप त्यांना प्रशिक्षण देणार आहे.

BJP Politics news
Maratha Reservation News : मनोज जरांगेंसोबत सेल्फी काढण्याचं सुनीलचं स्वप्न अपूर्णच राहिलं...!

भाजपने देशभरातील ८ हजार भाजप कार्यकर्त्यांमधून ३ हजार जणांची निवड केली आहे. या कार्यकर्त्यांना भाजपतर्फे विशेष प्रशिक्षण देण्यात येणार आहे. प्रशिक्षण घेतल्यानंतर या कार्यकर्त्यांना मध्य प्रदेश, छत्तीसगड, राजस्थान, मिझोराम, तेलंगणा या राज्यांमध्ये निवडणुकीच्या कामासाठी पाठवले जाणार आहे.

२०१४ आणि २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत भाजपने सोशल मीडिया आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा मोठ्या प्रमाणात उपयोग केला आहे. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत भाजपने ‘मोदी वन्स मोअर’ ही मोहीम देशभरात राबवली होती. ही मोहीम राबवण्यासाठी भाजपने तंत्रज्ञान अवगत असणारे वकील, शिक्षक, चार्टर्ड अकाउंटंट तसेच अन्य क्षेत्रांत काम करणाऱ्या भाजप कार्यकर्त्यांचा उपयोग केला होता. अशीच रणनीती सध्या भाजप आखत असल्याचे समजते.

BJP Politics news
Maharashtra BJP : मोदींच्या हॅटट्रिकसाठी आता फ्रेंड्स ऑफ बीजेपी अभियान; नेमले ४८ लोकसभेत संयोजक

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com