Prithviraj Chavan News Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Prithviraj Chavan News : पृथ्वीराज चव्हाणांच्या मतदारसंघात भाजपची 'पायाभरणी'; 34 कोटींच्या निधीला मंजुरी

Karad Politics : कराड दक्षिणमधील विकासकामांना मोठ्या प्रमाणावर मंजुरी...

Vishal Patil

Karad News : काँग्रेसचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाणांच्या कराड दक्षिण मतदारसंघात भाजपच्या डॉ. अतुल भोसलेंना बळ देण्यासाठी भाजपकडून जोरदार हालचाली सुरू आहेत. याचाच भाग म्हणून महायुती सरकारने नागपूरच्या हिवाळी अधिवेशनात भोसलेंच्या मतदारसंघातील विकासकामांसाठी तब्बल 34 कोटी 25 लाखांच्या निधीला मंजुरी दिली आहे. या निधीमुळे भाजपाकडून आगामी कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघावर विशेष लक्ष दिले जात असल्याचे दिसत आहे.

कराड दक्षिण मतदारसंघात काँग्रेस विरुद्ध भाजप असा सामना रंगलेला पाहायला मिळत असून सातारा जिल्ह्यात एकमेव काँग्रेसच्या ताब्यात असलेल्या मतदारसंघावर कब्जा मिळविण्यासाठी भाजपचे गेल्या 15 वर्षांपासून प्रयत्न सुरू आहेत. त्यामुळेच महायुती सरकारने या अधिवेशनात कराड दक्षिणेत भाजपचा आमदार नसतानाही कराड दक्षिणेत मोठ्या प्रमाणावर निधी दिला आहे. 

नागपूर येथे गुरुवारपासून सुरू झालेल्या हिवाळी अधिवेशनात महायुती सरकारने राज्याचा पुरवणी अर्थसंकल्प सादर केला. यात कराड दक्षिणमधील विकासकामांना मोठ्या प्रमाणावर मंजुरी दिली आहे.

भाजपाचे सातारा लोकसभा प्रभारी डॉ. अतुल भोसले (Atul Bhosale) यांच्या पाठपुराव्यामुळे कराड दक्षिणमधील सुमारे 34 कोटी 25 लाख रुपयांच्या विकासकामांना मंजुरी मिळाली दिली आहे. याबद्दल महायुती सरकारचे भोसले यांनी आभार मानले आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

कराड (Karad) दक्षिण मतदारसंघात 2014 पासून भाजप आपला उमेदवार निवडून आणण्यासाठी ताकदीने प्रयत्न करत आहे. 2014 ला या मतदारसंघात तिरंगी लढत झाली तेव्हा माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी 38 टक्के मते मिळवत विजय मिळवला होता. अपक्ष उमेदवार कै. विलासराव पाटील- उंडाळकर हे 30 टक्के मते घेवून दुसऱ्या स्थानावर होते तर भाजपचे डाॅ. अतुल भोसले यांनी 29 टक्के मते मिळवत पहिल्यादांच कराड दक्षिणमधून फाईट दिली होती.

तर 2019 साली काँग्रेसचे आमदार पृथ्वीराज चव्हाण (Prithviraj Chavan) विजयी झाले असले तरी डाॅ. अतुल भोसले यांच्या आणि विजयी मतांमध्ये अवघा 9 हजार 130 मतांचा फरक होता. तेव्हा आता आगामी काळातील विधानसभा निवडणुकीत विजय मिळविण्यासाठी डाॅ. भोसले यांना बळ देण्याचा प्रयत्न महायुतीच्या आजच्या भरगच्च निधीवरून दिसत आहेत.

(Edited By Deepak Kulkarni)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT