Karad News : कराड दक्षिणमधील अतुल भोसलेंवर खासदार उदयनराजे मेहरबान !

Development Fund : तेवीस गावांना दोन कोटी दहा लाख रुपये निधी मंजूर.
Udayanraje Bhosale, Atul Bhosale
Udayanraje Bhosale, Atul BhosaleSarkarnama
Published on
Updated on

Karad News : कराड दक्षिणमधील अतुल भोसलेंवर खासदार उदयनराजे भोसले मेहरबान झाले आहेत. त्यांनी कऱ्हाड दक्षिण विधानसभा मतदार संघातील २३ गावांमधील विविध विकासकामांसाठी खासदार उदयनराजे भोसले यांच्या निधीतून दोन कोटी १० लाख रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. भाजपचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य अतुल भोसले यांच्या प्रयत्नांना यश आले आहे.

कराड Karad तालुक्यातील विविध विकासकामांसाठी खासदार निदीतून निधी उपलब्ध व्हावा, अशी मागणी अतुल भोसले Atul Bhosale यांनी खासदार उदयनराजे Udayanraje भोसले यांच्याकडे केली होती. त्यानुसार त्यांनी राज्यसभा स्थानिक विकास निधीमधून सुमारे दोन कोटी १० लाख निधी मंजूर झाला आहे. त्यात नांदलापूर येथील गोपाळ वस्तीत समाजमंदिर बांधण्यासाठी १० लाख, वडगाव हवेली येथील कराड – तासगाव रस्ता - कोडोली फाटा ते जगताप वस्ती रस्त्याच्या खडीकरण व डांबरीकरणासाठी १० लाख निधी मंजूर झाला.

Udayanraje Bhosale, Atul Bhosale
Revanth Reddy: रेवंथ रेड्डीजी, महाराष्ट्रातील काँग्रेस नेत्यांनाही पेटून उठायला शिकवा!

तसेच विजयनगर, घारेवाडी, येणके, सैदापूर, धोंडेवाडी, म्हारुगडेवाडी, आंबवडे, आणे, शिंदेवाडी (कोळेवाडी), वानरवाडी, गोटेवाडी, संजयनगर – काले, ओंड या गावांमधील अंतर्गत रस्त्यांच्या सुधारणेसाठी प्रत्येकी १० लाख रुपयांप्रमाणे एकूण १ कोटी ३० लाख रुपये, आकाईचीवाडी व चोरमारवाडी येथील अंतर्गत रस्त्यांच्या सुधारणेसाठी प्रत्येकी ५ लाख रुपयांप्रमाणे एकूण १० लाख रुपये निधी देण्यात आला आहे.

साळशिरंबे येथील श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिराच्या सुशोभीकरणासाठी १० लाख, बामणवाडी येथे प्राथमिक शाळेच्या खोली बांधकामासाठी १० लाख, गणेशवाडी येथील स्मशानभूमीतील रस्ता दुरुस्तीसाठी १० लाख, कालेटेक येथील गटर बांधकामासाठी ५ लाख, पवारवाडी – नांदगाव येथे गटर बांधकामासाठी ५ लाख, पोतले येथे रस्ता काँक्रीटीकरणासाठी ५ लाख .रुपयांचा निधी देण्यात आला आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

पोतले येथील जि. प. शाळेसमोर पेव्हर्स ब्लॉक बसविण्यासाठी ५ लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. खासदार भोसले यांच्या सहकार्यामुळे व भोसले यांच्या प्रयत्नांमुळे विविध विकासकामांसाठी निधी मंजूर झाला आहे. त्या कामांना लवकरच प्रारंभ केला जाणार आहे.

Edited By : Amol Sutar

Udayanraje Bhosale, Atul Bhosale
Shivsena Controversy : हिवाळी अधिवेशनाआधीच नवा वाद ? 'या' ठिकाणाहून शिवसेनेची 'मशाल'च गायब

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com