Black Magic under Birthday banner sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Black Magic : स्थानिकच्या तोंडावर मिरजेत 'अघोरी कृत्य' राजकीय नेत्याच्या वाढदिवसाच्या बॅनरखाली सापडल्या हिरव्या-लाल कापडाच्या पोटल्या?

Black Magic Under Birthday Poster: सांगली जिल्ह्यातील मिरज शहरात वाढदिवसाच्या बॅनरखाली भानामतीचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरामुळे शहरात सध्या खळबळ उडाली असून चर्चा सुरू झाल्या आहेत.

Aslam Shanedivan

Sangli News : नुकताच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे कोकणातील नेते आणदार भास्कर जाधव यांनी कोकणातील नेते काळी जादू करतात. आपल्यावर देखील दोन वेळा काळ्या जादूचे प्रयोग झाले होते, अशी खळबळजनक कबुली दिली. ही कबुली देताना त्यांनी एक नेत्याचे नावही घेतल्याने राज्यात खळबळ उडाली होती. यामुळे राजकारण तापलेलं असतानाच सांगली जिल्ह्यातील मिरज येथे देखील एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. ज्यामुळे शहरातील नागरीकांच्या अंगावर काटा उभा राहिला आहे.

हा धक्कादायक प्रकार मिरज शहरातील माळी समाजाच्या स्मशानभूमी शेजारी रविवारी (ता.22) उघडकीस आला. जनशराज्य शक्ती पक्षाच्या जिल्हाध्यक्षांच्या वाढदिवसाचे बॅनर खाली हा प्रकार झाल्याने शहरात एकच खळबळ उडाली असून चर्चांना उधान आले होते. मिजर शहरात जनस्वराज्य शक्ती पक्षाचे जिल्हाध्यक्ष डॉक्टर पंकज म्हेत्रे यांच्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छांचे बॅनर शहरभर लागले होते.

पण शहरातील एका बॅनर खाली हा जादूटोणा करण्याचा प्रकार समोर आला आहे. धक्कादायक म्हणजे याच शुभेच्छा बॅनर खाली गेल्या तीन दिवसांपासून वेगवेगळ्या प्रकारच्या जादूटोण्याचे प्रकार केले जात आहेत.

म्हेत्रे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देणारा फलक येथे चार दिवसांपूर्वी लावण्यात आला होता. मात्र या बॅनर खाली गेल्या तीन दिवसांपासून भानामतीचा प्रकार केला जात असल्याचे समोर आले आहे. कधी हिरवा, कधी लाल तर कधी काळ्या रंगच्या कपड्यांत भानामती करण्यासाठी वापरले जाणारे साहित्य गुंडाळून टाकण्यात आले आहे.

दरम्यान आता हा प्रकार येथे येणाऱ्या नागरीकांच्या लक्षात आल्यानंतर तो त्यांनी म्हेत्रे यांच्या कानावर घातली. यानंतर म्हेत्रे यांनी, आपण अंधश्रद्धेला मानत नसल्याचे सांगत याकडे दुर्लक्ष केले आहे. पण या प्रकराची दखल अंधश्रद्धा निर्मूलन समितीने घेतली आहे.

अशा प्रकारच्या कोणत्याही भानामतीचा प्रकाराने कोणाचाही चांगले अथवा वाईट होत नाही. त्यामुळे या प्रकराला गांभीर्याणे घेऊ नये असे आवाहन अंधश्रद्धा निर्मूलन समितीने केले आहे. पण अशा गोष्टी करणाऱ्याविरोधात कठोर कारवाई करण्यासह अशा गोष्टींना आळा घालण्यासाठी अंधश्रद्धा निर्मूलन कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल होण्याची शक्यता आहे. पण आगामी स्थानिकच्या तोंडावर भानामती करून जनशराज्य शक्ती पक्षाच्या घोडदौडलेला रोखण्याचा प्रयत्न केला जात असल्याची चर्चा आता मिरजसह सांगली जिल्ह्यात सुरू झाली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT