Shashiknt Ghorpade sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

बेपत्ता पणन सहसंचालकांचा मृतदेह सापडला, आत्महत्येचे गुढ कायम

आज सकाळी एनडीआरएफच्या टीमने NDRF Team नीरा नदीपात्रात Nira River शोध मोहिम सुरू केली. त्यावेळी त्यांना श्री. घोरपडे Ghorpades Body यांचा मृतदेह नदीपात्रात आढळून आला.

अश्पाक पटेल

शिरवळ : राज्याचे पणन सहसंचालक शशिकांत पतंगराव घोरपडे बुधवारपासून बेपत्ता होते. त्यांच्या मोबाईलच्या शेवटच्या लोकेशनवरून ते सारोळा (ता. भोर) जवळील नीरा नदीपुलावरून बेपत्ता झाल्याचे आढळून आले होते. त्यानुसार पोलिसांनी महाबळेश्वर ट्रेकर्स व एनडीआरएफच्या टीमने आज सकाळी नीरा नदीपात्रात त्यांचा शोध सुरू केला. यावेळी एनडीआरएफच्या टीमला त्यांचा मृतदेह आढळून आला आहे. पण, श्री. घोरपडे यांच्या आत्महत्येचे गुढ अद्यापही कायम आहे.

पणन सहसंचालक शशिकांत घोरपडे हे काल (बुधवार) दुपारी साडेतीन वाजता त्यांच्या पुणे येथील कार्यालयातून बाहेर निघाले. मात्र, ते घरी आले नाहीत. त्यामुळे त्यांच्या कुटुंबियांनी व नातेवाईकांनी त्यांचा शोध सुरू केला. त्यांची कार सायंकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास टोलनाका पास करून सातारा बाजूकडे गेल्याची माहिती मिळाल्यानंतर त्यांच्या मोबाईलचे लोकेशन तपासले.

त्यावेळी शेवटचे लोकेशन सारोळा नीरा नदीपुलाचे लोकेशन होते. घोरपडे यांच्याकडे असलेली त्यांच्या मित्राची कार (क्र. एम एच ११ सी डब्ल्यू ४२४४) ही देखील पुलानजीकच्या हॉटेलसमोर मिळाली होती. त्यानुसार घोरपडे यांचे बंधू श्रीकांत घोरपडे यांनी शिरवळ पोलिस ठाण्यात त्यांच्या बेपत्ता होण्याची फिर्याद नोंदवली होती. त्यानुसार तपास सुरू करण्यात आला.

नीरा नदीपात्रात भोर येथील भोईराज जल आपत्ती निवारण पथक, महाबळेश्वर ट्रेकर्स, सातारा पोलिस व राजगड पोलिसांनी युध्द पातळीवर शोध मोहिम सुरू राबवली. पण, सायंकाळी उशीरापर्यंत त्यांचा पत्ता लागला नव्हता. त्यामुळे पोलिसांनी एनडीआरएफच्या टीमला बोलावले होते.

त्यानुसार आज सकाळी एनडीआरएफच्या टीमने नीरा नदीपात्रात शोध मोहिम सुरू केली. त्यावेळी त्यांना दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास श्री. घोरपडे यांचा मृतदेह नदीपात्रात आढळून आला. त्यामुळे श्री. घोरपडे यांनी आत्महत्या केल्याचे स्पष्ट झाले असून त्याचे नेमके कारण मात्र, अद्यापपर्यंत समजलेले नाही. त्याचा शोध शिरवळ पोलिस करत आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT