नसरापूर : महाराष्ट्र राज्याचे पणन सहसंचालक शशिकांत पतंगराव घोरपडे (वय 48) हे काल (बुधवार, ता. 12) पासून बेपत्ता आहेत. त्यांच्या मोबाईलचे शेवटचे लोकेशन सारोळा (ता. भोर) जवळील नीरा नदीपुलावर आढळल्याने नातेवाईकांनी शिरवळ पोलिस ठाण्यात त्यांच्या बेपत्ता होण्याची खबर दिली आहे.
श्री. घोरपडे यांच्या फिर्यादीनुसार नीरा नदीत व परिसरात त्यांचा शोध घेण्यात येत आहे. शशिकांत घोरपडे हे काल (बुधवार) दुपारी साडेतीन वाजता त्यांच्या पुणे येथील कार्यालयातुन बाहेर निघाले होते. मात्र, ते घरी आले नाहीत. म्हणून त्यांच्या कुटुंबियांनी व नातेवाईकांनी त्यांचा शोध सुरू केला आहे.
त्यांची कार सायंकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास टोलनाका पास करून सातारा बाजूकडे गेल्याची माहिती मिळाल्यानंतर त्यांच्या मोबाईलचे लोकेशन पाहिले. शेवटचे लोकेशन सारोळा नीरा नदीपुलाचे लोकेशन होते. घोरपडे यांच्याकडे असलेली त्यांच्या मित्राची कार (क्र. एम एच 11 सी डब्ल्यू 4244) ही देखील पुलानजीकच्या हॉटेलसमोर मिळाली आहे.
त्यानुसार घोरपडे यांचे बंधू श्रीकांत घोरपडे यांनी शिरवळ पोलिस ठाण्यात त्यांच्या बेपत्ता होण्याची फिर्याद नोंदवली आहे. त्यांचा तपास सुरू करण्यात आला आहे. नीरा नदीपात्रात भोर येथील भोईराज जल आपत्ती निवारण पथक, महाबळेश्वर ट्रेकर्स, सातारा पोलिस व राजगड पोलिसांनी युध्द पातळीवर शोध मोहिम सुरू ठेवली आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.