Solapur, 09 February : छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल वादग्रस्त विधान करणारे अभिनेते राहुल सोलापूरकर यांचे आणखी एक वादग्रस्त विधान पुढे आले आहे, त्यावरून राज्यात पुन्हा गदरोळ उठला आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा सोलापुरातील शिलेदार प्रचंड संतापला असून राहुल सोलापूरकर यांना ‘दिसलं तिथं तुडवा. पायातील चप्पलेने त्याचे तोंड फोडा आणि एक लाख मिळवा, अशी घोषणाच त्यांनी करून टाकली आहे.
राहुल सोलापूरकर (Rahul Solapurkar) यांनी छत्रपती शिवाजी महाराज हे आग्र्याहून लाच देऊन सुटले होते, असे विधान केले होते. त्यावरून शिवप्रेमींमधून जोरदार संताप व्यक्त होत आहे. तो वाद ताजा असतानाच सोलापूरकर यांचा डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य केल्याचा आणखी एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. त्यावरून ठाकरे गटाचे उपनेते शरद कोळी यांनी सोलापूरकर यांचे तोंड फोडण्याची भाषा केली आहे.
शरद कोळी म्हणाले, राहुल सोलापूरकर तुला लाज वाट नाही का? तुझ्या टोकावची सर्व केसं गेली तरी तुला अजून अक्कल आलेली नाही. महाराष्ट्राचे दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल वादग्रस्त विधान करून तसेच, डॉ बाबासाहेब आंबेडकर (Dr. Babasaheb Ambedkar) यांच्यावर एकेरी भाषेत बोलून त्यांचा तू अवमान करत आहेस. महाराष्ट्राच्या जनतेचा तू अवमान करत आहेस. तू कुणाच्या जीवावर एवढी मस्ती करतोस. तू भाजपच्या जीववर एवढी मस्ती करतोस
राज्यातील युवकांना मला सांगायचे आहे की छत्रपती शिवाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याबाबत अपशब्द वापरून जातीय तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे. या सोलापूरकरची मस्ती जिरवण्यासाठी त्याला दिसंल तिथं तुडवा. पायातील चप्पलेने त्याचे तोंड फोडा. त्या व्यक्तीला माझ्याकडून एक लाख रुपयाचे बक्षीस जाहीर करतो, अशी घोषणाच कोळी यांनी केली आहे.
दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनीही राहुल सोलापूकर यांच्यावर सडकून टीका केली आहे. छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दलचे शब्द गप्प मागे घे. नाही तर कोणी नाही मारलं तरी चालेल; पण मी तर तुला मारणार. डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि शिवाजी महाराज यांच्याबद्दलचा अपमान आम्ही सहन करणार नाही, असा इशाराही आव्हाड यांनी दिला.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.