Udayanraje Bhosale Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Udayanraje Bhosale : भारत-पाक युद्धासंदर्भात जागतिक पातळीवर चर्चा घडवून आणा, त्या चर्चेला मी जाईन : उदयनराजे

Ind Vs Pak War : कुणीतरी कुणाच्या तरी आईचा मुलगा आहे, कुणीतरी वडिल आहे. कसं वाटत असेल मला सांगा..? जगात कोणीही असू द्या. थोडं शांत बसून, आत्मचिंतन करून विचार केला पाहिजे.

Vijaykumar Dudhale, विश्वभूषण लिमये

Solapur, 11 May : भारत-पाकिस्तान युद्धासंदर्भात जागतिक पातळीवर चर्चा घडवून आणा. त्या चर्चेला मी जाईन. मी बोललो तर सगळ्यांना वाटतं, मी बोलतो म्हणून...पण तुमचे रणगाडे, प्लेन, मिसाईल हे खपवण्याकरिता तुम्ही हे करता का काय.? आज किती लोकांचा जीव जातोय, आज आपण पाहतोय...कधी कधी डोकं काम करायचं बंद होतं. त्या ठिकाणी बॉर्डरवर आपल्या कुटुंबातील कोण गेलं तर कसं वाटेल? असा सवाल खासदार उदयनराजे भोसले यांनी केला.

सोलापूर दौऱ्यावर आलेले खासदार उदयनराजे भोसले यांनी माध्यमांशी संवाद साधला, त्यावेळी त्यांनी भारत-पाक युद्धजन्य (Ind-Pak War) परिस्थितीबाबत विचारण्यात आलेल्या प्रश्नावर ते बोलत होते. ते म्हणाले, राष्ट्रांमध्ये कोणी या बाजूला राहतं, तर कोणी त्या बाजूला राहतं. फाळणी का झाली माहित नाही. फाळणी कोणी केली, हे मला माहित नाही, त्याचं संशोधन तुम्ही करा. कुणाला प्राईम मिनिस्टर व्हायचं..त्यावेळी किती जीव गेले, लोक मारताना बघताना, कित्येक जण म्हणतात ही कुठली पद्धत आहे.

कुणीतरी कुणाच्या तरी आईचा मुलगा आहे, कुणीतरी वडिल आहे. कसं वाटत असेल मला सांगा..? जगात कोणीही असू द्या. थोडं शांत बसून, आत्मचिंतन करून विचार केला पाहिजे. इथं काय, आपण काय करतोय.? याचे उत्तर कोणीतरी दिलं पाहिजे, असेही खासदार उदयनराजे भोसले (Udayanraje Bhosale) यांनी स्पष्ट केले.

डोनाल्ड ड्रम्प यांनी केलेल्या मध्यस्थीवरून सुरू असलेल्या वादावरही उदयनराजे भोसले यांनी भाष्य केले. ते म्हणाले, हे डोंगर जेवढे दिसत आहेत ना, ते तुम्ही आम्ही निर्माण केलेले नाहीत, पहिल्यापासून आहेत ते. हे निसर्ग आहे आणि निसर्गापेक्षा कोणी मोठे नाही. आज युद्ध थांबविण्यासाठी ड्रम्प यांनी केलेल्या मध्यस्थीवरूनही वाद निर्माण केला जात आहे, कमाल आहे, असे वक्तव्यही त्यांनी केले.

हिंदू-मुस्लिम वादावरही उदयनराजेंनी भाष्य केले. ते म्हणाले, चुकून तुम्हाला काय झालं आणि हॉस्पिटलमध्ये गेलात (कोणी जाऊ नये,) त्या वेळी तुम्ही का विचार करत नाही. तुझा ब्लड ग्रुप काय ए पॉझिटिव्ह की ए निगेटिव्ह असा विचारतो का. जे चाललंय ते कोणालाही मान्य नाही. पण ते बघून मला मानसिक त्रास होतो, असेही उदयनराजेंनी स्पष्ट केले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT