Udayanraje Meet Amit Shah : मोठी बातमी! खासदार उदयनराजे भोसले गृहमंत्री अमित शाहांना भेटले; म्हणाले,'...तर शिवाजी महाराजांचे नाव घेण्याचा अधिकार नाही'

MP Udayanraje Bhosale Meets Home Minister Amit Shah : अमित शाह यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, ऐतिहासिक दस्तावेजांचा योग्य अर्थ लावून, यापूर्वीच शिवछत्रपतींसह मराठा साम्राज्याचा शासनमान्य साधार इतिहास प्रसिद्ध करणे गरजेचे होते.
Udayanraje Bhosale  Amit Shah
Udayanraje Bhosale Amit Shahsarkarnama
Published on
Updated on

Udayanraje Bhosale News : खासदार उदयनराजे भोसले यांनी आज (गुरुवारी) गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली. शिवाजी महाराज यांच्या विषयी चुकीचे वक्तव्य करणाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी उदयनराजे यांनी शाहा यांच्याकडे केली. या भेटीविषयी उदयनराजे यांनी आपल्या फेसबूक अकाऊंटवरू माहिती दिली आहे.

उदयनराजे भोसले म्हणाले, काही विकृत मनोवृत्तीचे लोक गलिच्छ पध्दतीने छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजीमहाराज आणि राजमाता जिजाऊ मॉसाहेब यांचा अवमान होईल असे भाष्य, टिपणी किंवा कृती करतात. केंद्र व राज्यशासनाने अशा या प्रवृत्तींना धडकी भरवणारा मकोका/ टाडा सारखा अजामिनपात्र आणि 10 वर्षे सश्रम कारावासाची व जबर दंडाची शिक्षा असलेला विशेष कायदा पारित करावा.

Udayanraje Bhosale  Amit Shah
Cooperative Taxi Service : ओला, उबेरला टक्कर देण्यासाठी मोदी सरकारची 'सहकार टॅक्सी'; अमित शहांचा प्लॅन समजून घ्या...

कायदा परित करावा अन्यथा छत्रपती शिवाजी महाराज यांचे नाव घेण्याचा आपल्याला कोणालाच अधिकार राहणार नाही, अशी भूमिका मांडताना उदयराजे भोसले यांनी या संदर्भात केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना निवेदन दिले.

शाह यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, राज्यशासनाने तज्ज्ञांशी विचारविमर्श करुन, ऐतिहासिक दस्तावेजांचा योग्य अर्थ लावून, यापूर्वीच शिवछत्रपतींसह मराठा साम्राज्याचा शासनमान्य साधार इतिहास प्रसिध्द करणे गरजेचे होते. आज विकृत प्रवृत्ती असलेली व्यक्ती, त्याला जसे समजले, वाटते आहे अश्या पध्दतीने इतिहासातील प्रसंगाचे वर्णन करुन अकारण विवाद निर्माण करतो. अश्या प्रवृत्तींमुळे समाजामध्ये दुही पसरतेच परंतु राज्यातील देशातील कायदा आणि सुव्यवस्था देखील बिघडते.

शेजारी राहणाऱ्यांची मने कुलूषित होतात आणि त्याचे दिर्घ परिणाम समाजाला भोगावे लागतात ही वस्तुस्थिती आहे. आमच्या संयमाचा कडेलोट होण्यापूर्वीच राज्य व केंद्र शासनाने छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज आणि एकंदरीत मराठा साम्राज्याचा इतिहास अधिकृतपणे प्रसिध्द करावा त्याचबरोबरीने अश्या प्रवृत्तींचेबाबतीत कायदेशीर कारवाई करता येणारा तसेच , किमान 10 वर्षाची शिक्षा असणारा अजामिनपात्र विशेष कायदा पारित करावा.

दिल्लीत स्मारक उभारा

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या कार्यकर्तुत्वाचा अतुलनीय वारसा आपल्याला लाभला आहे. सपूर्ण जगासाठी प्रेरणास्त्रोत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनकार्याची प्रचिती देणारे राष्ट्रीय स्मारक नवी दिल्ली येथे उभारणे गरजेचे आहे. या स्मारकामध्ये राष्ट्रीय आणि आतर्राष्ट्रीय स्तरावरुन, संशोधन आणि संकलित केलेले छत्रपतींविषयी अप्रकाशित दस्तावेज, चित्रे, शस्त्रांस्त्रे, ऐतिहासिक नोंदी, चित्रे, कलाकृती, युध्दनिती, इत्यादींचा समावेश असावा, अशी मागणी देखील निवेदनातून गृहमंत्र्यांकडे करण्यात आली.

किल्ल्यांचे संवर्धन करावे

मराठा साम्राज्याचा किंबहुना छत्रपतींच्या काळात, महाराष्ट्रातीलच नव्हे तर देशभरातील गडकिल्ले आणि ऐतिहासिक घटना घडल्या त्याचे साक्षीदार असलेल्या स्वराज्याच्या चार राजधानी व अन्य ऐतिहासिक ठिकाणांचे शिवस्वराज्य सर्किट निर्माण केल्यास, गडकिल्यांचे जतन होवून, भावी पिढीला चिरंतन प्रेरणा मिळणार आहे. त्यामुळे पहिल्या टप्यात महाराष्ट्रातील किल्ले राजगड, किल्ले रायगड,किल्ले अजिंक्यतारा या तीन राजधानी किल्ले व परिसराचा विकास करावा, त्यानंतर दुस-या टप्यात राजधानी जिंजी (कर्नाटक), पानीपत, आग्रा, इंदूर, ग्वालियर, तंजावर, यासह अन्य ठिकाणच्या विकासाचे धोरण आखावे, अशी देखील मागणी उदयनराजेंनी निवेदनाद्वारे केली.

Udayanraje Bhosale  Amit Shah
Kolhapur : मुश्रीफ-घाटगे एकाच पक्षात येणार? कार्यकर्त्यांना कुणकुण लागताच वातावरण टाईट

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com