Praful Patel : राष्ट्रवादीच्या एकीकरणाच्या चर्चेवर प्रफुल पटेल यांचे सूचक विधान

NCP Unification News : दोन पक्षासंदर्भात चर्चा होत असताना त्या ठिकाणी आपण वैयक्तीक मत मांडणं योग्य नाही. राष्ट्रवादी काँग्रेसची आम्ही प्रमुख नेतेमंडळी एकत्र बसून चर्चा करू. त्यानंतर त्यावर भाष्य करणे योग्य राहील.
Praful Patel
Praful PatelSarkarnama
Published on
Updated on

Nagpur, 11 may : ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या एका मुलाखतीमुळे राज्याच्या राजकारणात पुन्हा एकदा खळबळ उडाली आहे. अजित पवार आणि सुप्रिया सुळे हे बहीण-भाऊ पुन्हा एकत्र येणार, अशी चर्चा रंगली आहे. त्यावर भाजपकडून प्रतिक्रिया देताना सुधीर मुनगंटीवार यांनी ते दोन्ही बहीण-भाऊ महाराष्ट्राच्या हितासाठी एकत्र येत असतील तर आम्हाला आनंदच आहे, असे विधान केले होते. या सर्व प्रकारावर राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकारी अध्यक्ष खासदार प्रफुल पटेल यांनी मोठे सूचक विधान केले आहे.

दोन राजकीय पक्ष एकत्र येण्याचे महत्वपूर्ण विषय हे माध्यमांमध्ये चर्चा करण्याचे नसतात. दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या एकत्रिकरणाचा कोणताही प्रस्ताव आमच्यापर्यंत पोचलेला नाही. दोन पक्षासंदर्भात चर्चा होत असताना त्या ठिकाणी आपण वैयक्तीक मत मांडणं योग्य नाही. राष्ट्रवादी काँग्रेसची आम्ही प्रमुख नेतेमंडळी एकत्र बसून चर्चा करू. त्यानंतर त्यावर भाष्य करणे योग्य राहील, असे प्रफुल पटेल (Praful Patel) यांनी स्पष्ट केले.

शरद पवार (Sharad Pawar) यांनी एका मुलाखतीत दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र आल्यास आश्यर्च वाटणार नाही. एकत्र येण्याचा निर्णय सुप्रिया सुळे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी घ्यायचा आहे. याशिवाय सत्तेत बसायचे की विरोधात बसायचे, याचा निर्णय खासदार सुप्रिया सुळे यांनी घ्यायचा आहे, असेही पवारांनी म्हटले होते. त्यानंतर राज्यात एकच खळबळ उडाली होती.

Praful Patel
Dr. Shirish Valsangkar : डॉ. वळसंगकर यांच्या सूनेचे ‘ते’ पत्र पोलिसांनीच सोशल मीडियातून तातडीने व्हायरल केले

ज्येष्ठ नेते पवारांच्या विधानावर खासदार सुप्रिया सुळे यांनी दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येण्याबाबत मी एकटी निर्णय घेऊ शकत नाही. कार्यकर्त्यांशी चर्चा करावी लागेल. त्याबाबतचा निर्णय हा सर्वांशी चर्चा करून घ्यावा लागेल, असे म्हटले होते, त्यामुळे खासदार सुप्रिया सुळे यांच्या मनात नेमकं काय आहे, हेही समजू शकलेले नाही.

Praful Patel
Dilip Mane : दिलीप मानेंनी सांगितला मुख्यमंत्री फडणवीसांसमोर ठरलेला सभापतिपदाचा फॉर्म्युला....

दरम्यान, माढ्याचे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार अभिजीत पाटील यांनी भारत-पाकिस्तानमधील युद्धजन्य परिस्थिती निवळल्यानंतर दोन्ही राष्ट्रवादीच्या एकत्रीकरणाबाबत निर्णय होईल. पहिल्यांदा दोन्ही पक्षाच्या आमदारांची बैठक बोलावली जाईल, त्यात सर्वांची मते अजमावून घेतली जातील आणि त्यानंतर दोन्ही राष्ट्रवादीच्या एकीकरणाची प्रक्रिया सुरू होईल, असे आमदार पाटील यांनी स्पष्ट केले होते.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com