Hatkanangale Lok Sabha Election: हातकणंगले लोकसभा मतदारसंघातून (Hatkanangle Lok Sabha Constituency) शिवसेना ठाकरे गट उमेदवार देण्यावर ठाम असून, यासंबंधीत महत्त्वाची बैठक आज मातोश्रीवर पार पडणार आहे. या बैठकीत हातकणंगलेच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब होणार असून, माजी आमदारांसह स्थानिक पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि खासदार संजय राऊत अंतिम निर्णय घेणार आहेत. दुपारी साडेबारा वाजता ही बैठक होणार असून, या बैठकीत राहुल आवाडे, महाराष्ट्र क्रांती सेनेचे सुरेश पाटील, राहुल महाडिक यांच्या नावाची चाचणी केली जाणार आहे.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी (Raju Shetty) यांची महाविकास आघाडीमध्ये (MVA) जाण्याचे शक्यता धूसर झाली आहे. अशातच शिवसेना (Shivsena) ठाकरे गटाने हातकणंगले लोकसभा मतदारसंघात गोकुळचे संचालक डॉ. चेतन नरके यांच्यासमोर उमेदवारीचा प्रस्ताव ठेवला होता. मात्र, हा प्रस्ताव नरके यांनी नाकारल्यानंतर ठाकरे गटाने अन्य तीन नावांची चाचपणी केली आहे. इचलकरंजीचे आमदार प्रकाश आवाडे यांचे सुपुत्र राहुल आवाडे, महाराष्ट्र क्रांती सेनेचे सुरेश पाटील आणि सांगली जिल्हा बँकेचे राहुल महाडिक यांच्या नावाची चाचपणी झाल्याची माहिती समोर येत होती. गुरुवारी शिवसेनेचे उपनेते संजय पवार यांनी राहुल आवाडे (Rahul Awade) यांची भेट घेऊन उमेदवारीबाबत चर्चा केली आहे.
दरम्यान, आज शिवसेना ठाकरे गटाची मातोश्रीवर 12:30 वाजता माजी आमदार आणि स्थानिक पदाधिकाऱ्यांची महत्त्वाची बैठक होणार आहे. या बैठकीसाठी माजी आमदार सुजित मिनचेकर, माजी आमदार सत्यजित सरुडकर, माजी आमदार उल्हास पाटील यांच्यासह प्रमुख पदाधिकारी रवाना झाले आहेत. या बैठकीत शिवसैनिकांच्या भावना समजून घेऊन उमेदवारीवर शिक्कामोर्तब केले जाण्याची शक्यता आहे.
हातकणंगले लोकसभा मतदारसंघासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी पुन्हा एकदा धैर्यशील मानेंच्या (Dhairyasheel Mane) नावाला पसंती दर्शवली आहे. परंतु, खासदार मानेंना उमेदवारी जाहीर होताच भाजपच्या कार्यकर्त्यांनी रोष दाखवण्यास सुरुवात केली आहे. शिंदे गटाचा उमेदवार निश्चित झाल्यामुळे आता ठाकरेंचा उमेदवार कोण असणार याची उत्सुकता लागली आहे.
(Edited By Jagdish Patil)
R
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.