FIR against 60 people in Anjangaon Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Anjangaon Statue Controversy : अंजनगाव पुतळा प्रकरणी लक्ष्मण हाकेंच्या अडचणी वाढल्या; हाकेंसह 60 ते 70 जणांविरोधात गुन्हा दाखल

Laxman Hake Against Police Case File: अंजनगाव खेलोबा येथील शिवाजी महाराजांच्या पुतळा प्रकरणात लक्ष्मण हाके यांच्यासह 60-70 जणांवर गुन्हे दाखल झाले आहेत, त्यामुळे हाके यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे.

अक्षय गुंड

Madha, 07 April : माढा तालुक्याच्या अंजनगाव येथील खेलोबा मंदिराच्या प्रवेशद्वारासमोर बसविण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारुढ पुतळ्याच्या प्रकरणी ओबीसी नेते प्रा. लक्ष्मण हाके यांच्यासह 60 ते 70 जणांच्या विरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

अंजनगाव (Anjangaon ) येथील खेलोबा मंदिर जागेची मोजणी करताना गोंधळ घालत, अधिकाऱ्याला धक्काबुक्की करून धमकी देणे, शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी हाके यांच्यासह 60 ते 70 जणांविरोधात माढा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

याबाबत माढा (Madha) येथील भूमी अभिलेख कार्यालयातील बाळासाहेब गायकवाड यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, अंजनगाव येथील खेलोबा मंदिरासमोर छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा अनधिकृतपणे उभारण्यात आला होता. त्यावरून धनगर व मराठा समाजात सलग तीन दिवस तणाव निर्माण झाला होता.

दोन्ही बाजूच्या कार्यकर्त्यांनी रस्ता ठिय्या मांडून रस्ता अडवला होता. त्यानंतर प्रशासनाने दोन्ही बाजूंशी चर्चा करून तोडगा काढण्याचा निर्णय घेतला होता. त्या वेळी संबंधित जागेची मोजणी करण्याचे आदेश प्रशासनाने दिले होते.

मंदिर परिसरात ३ एप्रिल रोजी सायंकाळी साडेपाचच्या सुमारास मोजणीचे काम सुरू असताना आंदोलनासाठी जमलेल्या लोकांनी आरडाओरड व शिवीगाळ करत मोजणी पथकाकडे धाव घेतली. या वेळी ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी तक्रारदार गायकवाड यांचा शर्ट पकडून धक्काबुक्की करत ‘जागेची मोजणी करू नका, नाहीतर एका-एकाला बघून घेतो, अशी धमकी दिल्याचे फिर्यादीत नमूद आहे.

या घटनेमुळे शासकीय कामात अडथळा निर्माण झाल्याने पोलिसांनी तत्काळ हस्तक्षेप करत परिस्थिती नियंत्रणात आणली होती. दरम्यान, या प्रकरणी लक्ष्मण हाके यांच्यासह ६० ते ७० जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT