

Solapur, 03 April : माढा तालुक्यातील अंजनगाव येथील खेलोबा मंदिराच्या परिसरात बसविण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यामुळे गावात तीन दिवसांपासून तणावाची परिस्थिती आहे. दोन्ही बाजू आपल्या मागण्यावर ठाम असून कोणीही माघार घ्यायला तयार नाहीत, दोन्ही बाजूंकडून ठिय्या आंदोलन सुरू आहे. मात्र, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या चेंबरमध्ये या वादावर आमदार अभिजीत पाटील आणि आमदार गोपीचंद पडळकर यांच्यात चर्चा झाली होती. मात्र, पुतळा स्थलांतरित करण्यास विरोध होत असल्याने वादावर तोडगा निघू शकलेला नाही.
अंजनगाव (Anjangaon) येथील खेलोबा मंदिर परिसरात शिवाजी महाराजांचा पुतळा बसविण्यात आल्यामुळे पालखीला अडथळा निर्माण होऊ शकतो, त्यामुळे तो पुतळा इतरत्र स्थलांतरित करण्यात यावा, अशी मागणी धनगर समाजाकडून होत आहे, दुसरीकडे पुतळा स्थलांतरित करण्यास मराठा समाजाकडून विरोध होत आहे, त्यामुळे सलग तिसऱ्या दिवशी दोन्ही समाज ठिय्या आंदोलन करत आहेत.
याबाबत आमदार गोपीचंद पडळकर (Gopichand Padalkar ) म्हणाले, माढ्याचे आमदार अभिजीत पाटील यांच्याशी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या चेंबरमध्ये बोलणं झालं. आपल्या कोणामध्ये वाद नसले पाहिजेत. पुढं सात गुंठे जागा आहे, त्याठिकाणी आपण पुतळा बसवू या, असं आमचं बोलणं झालं होतं. पुतळा वाजत गाजत बसला पाहिजे. असं आमचं मत आहे.
राज्यात ज्यावेळी देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असतात, तेव्हा राज्यात अस्थिर वातावरण आहे, असा दाखविण्याचा घाणेरडा प्रकार केला जातो. मराठवाड्यात जी अस्थिरता आहे, ती पश्चिम महाराष्ट्रात आणायची आहे, त्यामागं मोठं राजकारण आहे. दिसायला हे पुतळ्याचे प्रकरण दिसत असलं तरी त्यामागं मोठं षडयंत्र आहे. त्याच्या खोलात जाण्याची आवश्यकता आहे, असा आरोप पडळकर यांनी केला.
ते म्हणाले, काही लोकांना महाराष्ट्र अस्थिर करायचा आहे, या कारस्थानी लोकांच्या पाठीशी जनता नाही. पण, त्यांना जातीय दंगली करायच्या आहेत. महाराष्ट्र अस्थिर करायचा प्रयत्न होतो आहे. मात्र, हे खपवून घेतलं जाणार नाही. जशास तसे उत्तर दिले जाईल.
गोपीचंद पडळकरांचा इशारा कुणाला?
तो कोणीतरी आम्हाला शिव्या देतो आहे. तुझ्या हिम्मत असेल तर पुढे ये ना. कालपासून तुझा फोन बंद आहे. तुझ्याशी आमची पोरचं लढतील, असा इशाराही गोपीचंद पडळकर यांनी दिला.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.