Anjangaon Statue Controversy : अंजनगावमधील पुतळा हलविण्याचा निर्णय झाल्यानंतर प्रशासनाचा मोठा निर्णय; माढा, मोहोळसह 50 गावांतील...

Internet services suspend : अंजनगाव पुतळा वादानंतर तणाव नियंत्रणासाठी माढा व मोहोळ तालुक्यात इंटरनेट सेवा बंद करण्यात आली, प्रशासनाने प्रतिबंधात्मक पावले उचलल्याचे स्पष्ट झाले आहे.
Anjangaon Statue
Anjangaon Statue Sarkarnama
Published on
Updated on

Solapur, 04 April : माढा तालुक्यातील अंजनगाव येथील खेलोबा मंदिर परिसरातील छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा हलविण्याचा निर्णय घेतल्यानंतर जिल्हा प्रशासनाने मोठा निर्णय घेतला आहे. माढा आणि मोहोळ तालुक्यासह सुमारे 50 गावांतील इंटरनेट सेवा शनिवारी (04 एप्रिल) पहाटेपासून बंद ठेवली आहे. ती सायंकाळी साडेसहापर्यंत कायम होती.

दरम्यान, अंजनगाव (Anjangaon) येथील खेलोबा मंदिर परिसरातील शिवरायांचा अश्वारुढ पुतळा स्थलांतरित करून तो बसस्थानकालगत ग्रामपंचायतीच्या जागेत बसविण्यात आला आहे. कोल्हापूर परिक्षेत्राचे पोलिस महानिरीक्षक सुनील फुलारी, पोलिस अधीक्षक अतुल कुलकर्णी, प्रांताधिकारी जयश्री आव्हाड आणि तहसीलदार संजय भोसले यांच्या उपस्थितीत पुतळ्याची पूजा करण्यात आली.

खेलोबा मंदिर परिसरात छत्रपती शिवाजी महाराजांचा (Shivaji Maharaj) पुतळा बसविण्यात आला होता. त्यावरून अंजनगावमध्ये तीन दिवस तणावाचे वातावरण होते. पुतळा बसविण्यास विरोध नाही. मात्र, तो मंदिराच्या परिसरातून हलविण्यात यावा. तो पालखी मार्गावर येतो, त्यामुळे पालखीस अडथळा येऊ शकतो, त्यामुळे पुतळा हलविण्यात यावा, अशी धनगर समाजाची मागणी होती.

ती जागा सावर्जनिक बांधकाम विभागाची आहे, असे सांगून पुतळा स्थलांतरित करण्यास मराठा समाजाकडून विरोध दर्शविण्यात येत होता. दोन्ही समाज तीन दिवस ठिय्या देऊन बसले होते, त्यामुळे गावात तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती. प्रक्षोभक विधानांमुळे तेढ वाढत चालला होता.

Anjangaon Statue
Satara ZP Update : सातारा ZP सभापती निवडणुकीवर बहिष्कार का? शंभूराज देसाई म्हणाले, ‘भाजपसोबत कोणत्याही परिस्थितीत...’

अखेर शुक्रवारी दुपारी माजी आमदार राजन पाटील यांनी दोन्ही समाजातील प्रमुख व्यक्तींसोबत चर्चा केली. मात्र, सायंकाळी पालकमंत्री जयकुमार गोरे यांची या वादात एन्ट्री झाली, त्यानंतर घडामोडींना वेग आला. पालकमंत्री गोरे, माजी आमदार राजन पाटील, पोलिस महानिरीक्षक सुनील फुलारी, जिल्हाधिकारी के. कार्तिकेयन, पोलिस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांच्या उपस्थितीत मोहोळमध्ये दोन्ही समाजातील प्रमुख व्यक्तींशी वेगवेगळी चर्चा करण्यात आली.

या बैठकीत खेलोबा मंदिर परिसरातील शिवाजी महाराजांचा पुतळा स्थलांतरित करण्यास मराठा समाजाच्या प्रतिनिधीनी समती दर्शविली. गावातील बसस्थनकालगतीची जागा निश्चित करून त्या ठिकाणी पुतळा बसविण्यात आला आहे. त्या पुतळ्याच्या सुशोभिकरणासाठी एक कोटी रुपयांचा निधी देण्याची घोषणा पालकमंत्री गोरे यांनी केली.

पुतळा स्थलांतरित करण्याचा निर्णय घेतल्यानंतर जिल्हा पोलिस प्रशासनाने खबरदारीचा उपाय म्हणून माढा, मोहोळ तालुक्यासह ५० गावांतील इंटरनेट सेवा बंद ठेवण्याचा निर्णय घेतला होता. रात्री साडेसहापर्यंत इंटरनेट सेवा बंद होती. अफवा पसरविणे, चुकीचा संदेश प्रसारित करणे याला आळा घालण्यासाठी पोलिस प्रशासनाने हा निर्णय घेतल्याचे सांगितले जात आहे.

Anjangaon Statue
Satara ZP : सातारा जिल्हा परिषदेत जयकुमार गोरेंनी राष्ट्रवादीचा चौथा सदस्य फोडला; ऋतुजा शिंदे थेट सभापती

दुसरीकडे अंजनगाव येथे येऊन लक्ष्मण हाके यांना कपडे काढून मारण्याची धमकी देणारे बाळराजे आवारे यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com