Yashwant Mane Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

MLA Yashwant Mane : राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार यशवंत माने 'CBI'च्या कचाट्यात अडकणार?

Mayur Ratnaparkhe

Shivsena and NCP News : राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) मोहोळचे आमदार यशवंत माने यांनी खोट्या एससी जातीच्या दाखल्यावर केंद्र सरकारकडून तीन पेट्रोल पंप घेतल्याची तक्रार सीबीआयकडे दाखल झाली आहे. 17 मे 2022 रोजी मोहोळचे शिवसेना ( एकनाथ शिंदे) नेते सोमेश क्षीरसागर यांनी ही तक्रार दाखल केली आहे.

आता या तक्रारीची सीबीआयकडून चौकशी प्रक्रिया सुरू झाल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे यशवंत माने सीबीआयच्या कचाट्यात अडकण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

मोहोळचे आमदार यशवंत माने यांनी कॉलेज जीवनात विमुक्त जाती कॅटेगिरीतून शिष्यवृत्ती घेतल्याचा तक्रारदाराचा दावा आहे. तसेच बुलडाणा तालुक्यातील चिखली गावचा रहिवासी दाखवून एससी जातीचा बोगस दाखला आणि व्हॅलिडिटी काढल्याचाही तक्रारदाराकडून आरोप केला गेला आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

आधीच जागावाटपाच्या मुद्द्यावरून महायुतीमधील शिवसेना आणि राष्ट्रवादी (Ajit Pawar) गटात अद्याप एकमत झालेले नाही. त्यात बारामती मतदारसंघात उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या पत्नी सुनेत्रा पवार या निवडणूक रिंगणात उतरणार असल्याचे निश्चित असताना, शिवसेना शिंदे गटाचे नेते विजय शिवतारे यांनी बारामतीमधून अपक्ष निवडणूक लढवणार असल्याची घोषणा केली आहे. यामुळे शिवसेना आणि राष्ट्रवादीमधील नेत्यांमध्ये धुसफूस वाढली आहे. आरोप-प्रत्यारोपांनाही सुरुवात झाली आहे.

त्यात आता एकनाथ शिंदे(Eknath Shinde) गटाच्या नेत्याच्या दोन वर्षांपूर्वीच्या तक्रारीवरूनच अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या आमदारासमोर सीबीआय चौकशीचं संकट निर्माण झाल्याने, या दोन्ही पक्षांमधील तणाव अधिक वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. तक्रार जरी दोन वर्षांपूर्वी दाखल झालेली असली, तरी ती आता नेमकी निवडणुकीच्या अगोदर सीबीआयने चौकशीसाठी हाती घेतल्याने, यावर पुढे काय होते याकडे सर्वांचे लक्ष आहे.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

R

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT