Kolhapur Lok Sabha Election 2024 : शाहू महाराज विरुद्ध समरजीत घाटगे सामना होणार? महाडिकांनी दिले संकेत!

Lok Sabha Election 2024 : महाविकास आघाडीच्या उमेदवारीबाबतही काँग्रेस आणि ठाकरे गटाचा त्यांनी समाचार घेतला आहे.
Kolhapur Lok Sabha Election 2024 : Chhatrapati Shahu Maharaj : Dhananjay Munde : Samarjeet Ghatage
Kolhapur Lok Sabha Election 2024 : Chhatrapati Shahu Maharaj : Dhananjay Munde : Samarjeet GhatageSarkarnama
Published on
Updated on

Kolhapur News : आगामी लोकसभा निवडणूक जसजशी जवळ येत आहे, तसतसे राजकीय वातावरण अधिकच तापू लागले आहे. कोल्हापूर जिल्ह्यात लोकसभा, विधानसभा, महापालिका असो वा ग्रामपंचायत निवडणूक या निवडणुकांमध्ये 'बंटी' आणि 'मुन्ना'चा सामना ठरलेलाच असतो. त्यातच आता आगामी लोकसभा निवडणुकीवरून बंटी आणि मुन्ना पुन्हा एकदा आमने-सामने येण्याची शक्यता आहे. (Latets Marathi News)

थेट पाईपलाईन कामाची पाहणी करण्यास गेलेल्या राज्यसभेचे खासदार धनंजय महाडिक यांनी काँग्रेसचे नेते सतेज पाटील यांच्यावर जोरदार निशाणा साधला. महाविकास आघाडीच्या उमेदवारीबाबतही काँग्रेस आणि ठाकरे गटाचा त्यांनी समाचार घेतला आहे. तसेच त्यांनी यावेळी समरजीत घाटगे यांच्या उमेदवारीबाबतही भाष्य केले.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

"महाविकास आघाडीत ही जागा काँग्रेसकडे येते असे समजल्यावर नेत्याने आपल्या गळ्यातली माळ दुसऱ्यांच्या गळ्यात घातली आहे. चांगली संधी येत असेल तर तुमच्यात दम नाही का? असा सवाल काँग्रेस नेत्याला करत हा नेता फसवा आहे. हे जनतेला कळालेले आहे. दिलेला शब्द पाळत नाही हे जनतेला कळलेले आहे," अशा शब्दात खासदार धनंजय महाडिक यांनी आमदार सतेज पाटील यांचे नाव न घेता टीका केली आहे.

Kolhapur Lok Sabha Election 2024 : Chhatrapati Shahu Maharaj : Dhananjay Munde : Samarjeet Ghatage
Satyajit Patil Sarudkar : हातकणंगलेत राजू शेट्टींविरोधात सत्यजित पाटील-सरूडकरांच्या नावाची चर्चा

"कोल्हापुरात महाविकास आघाडीकडून उमेदवार कोण असावा? हा त्यांचा अंतर्गत विषय आहे. 30 ते 35 वर्षांनी ही जागा काँग्रेसला मिळत आहे. या पाठीमागे षडयंत्र आहे, हे सर्वांना ज्ञात आहे. काँग्रेसकडून गेल्या दोन-तीन वर्षांपासून तयारी करणारे दोघेजण इच्छुक होते. त्यामध्ये गांधी परिवाराच्या जवळ असणारे बाजीराव खाडे हे देखील चार वर्षापासून तयारी करत आहेत. चेतन नरके यांना देखील महाविकास आघाडीने शब्द दिला होता. मूळ जागा शिवसेनेची होती मात्र ती आता भरकटली आहे," अशा शब्दात खासदार महाडिक यांनी टीका केली आहे.

Kolhapur Lok Sabha Election 2024 : Chhatrapati Shahu Maharaj : Dhananjay Munde : Samarjeet Ghatage
Kolhapur News: शेवटच्या क्षणापर्यंत लोकसभेचा सर्व्हे; त्यावरच ठरणार कोल्हापूर-हातकणंगलेतील रणनीती

"विधानपरिषद निवडणुकीत ते त्यांचे बंधू आणि आमदार विनय कोरे हे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे गेले होते. त्यांनी त्या ठिकाणी शब्द दिला होता. मी राजाराम कारखान्याची निवडणूक लढवणार नाही, पण मला बिनविरोध निवडून द्या. मात्र राजाराम कारखान्याची निवडणूकमध्ये त्यांनी पॅनल उभा करून लोकांना वाईट सांगितले.

जाहीरपणे आमदार विनय कोरे (Vinay Kore) यांनी ही गोष्ट जनतेसमोर सांगितले होती. त्यामुळे शब्द पलटणारा नेता ही त्यांची प्रतिमा निर्माण झाली असल्याचे सांगत, महाडिक यांनी निशाणा साधला. (Latest Political News)

Kolhapur Lok Sabha Election 2024 : Chhatrapati Shahu Maharaj : Dhananjay Munde : Samarjeet Ghatage
NCP Sharad Pawar News : अजितदादांच्या आमदाराला शरद पवार गटाने मतदारसंघातच घेरले...

"महायुतीच्या उमेदवारीवरून बोलताना धनंजय महाडिक (Dhananjay Mahadik) यांनी कोल्हापूर किंवा हातकणंगले लोकसभा मतदारसंघ भाजपला गेल्यास त्या ठिकाणी बंडखोरी होईल असे मला वाटत नाही. महायुतीचे तिन्ही नेते सक्षम आहेत नाराजी दूर करण्याचा प्रयत्न होईल. जर महायुतीत ही जागा राष्ट्रवादीला गेली तर हसन मुश्रीफ हा चांगला चेहरा आमच्यासमोर आहे. समरजीत घाटगे नाही म्हणतील हे मी तुमच्याकडूनच ऐकले. पण पक्षादेश आला तर ते निश्चितच निवडणूक लढवतील," असेही महाडिक म्हणाले.

(Edited By - Chetan Zadpe)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com