sharad pawar sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Sharad Pawar : शरद पवार देणार भाजपला दुसरा धक्का; बडा नेता गळाला?

Rahul Gadkar

केंद्रीय मंत्री अमित शहा कोल्हापुरात आल्यानंतर त्यांनी विरोधी पक्षातील लोकप्रतिनिधी फोडा, अशा पद्धतीचा सल्ला भाजप पदाधिकाऱ्यांना दिला. शहा यांच्या मेळाव्याला आठवडा न उलटताच कोल्हापूर जिल्ह्यातील भाजपला आता दुसरे खिंडार पडण्याची शक्यता आहे.

कोल्हापूर जिल्ह्यातील भाजपचा बडा नेता राष्ट्रवादी काँग्रेसच्या ( शरदचंद्र पवार ) गळाला लागण्याची शक्यता आहे. चंदगड विधानसभा मतदारसंघातून कागलची पुनरावृत्ती होणार असल्याचं बोललं जात आहे.

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर चंदगडमध्ये राजकीय भूकंप होणार असल्याची चर्चा मतदारसंघात आहे. भाजप नेते, शिवाजीराव पाटील 'तुतारी' हातात घेणार, असल्याचं सांगितल जात आहे. शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून ( Ncp ) पाटील यांच्याशी संपर्क झाल्याची माहिती सूत्रांनी 'सरकारनामा'ला आहे. मात्र, पाटील कोणता निर्णय घेतात हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे.

कागलमधून समरजितसिंह घाटगे ( Samarjitsinh Ghatge ) यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये ( शरदचंद्र पवार ) प्रवेश केला आहे. यातच चंडगडमधून शिवाजीराव पाटील यांनी 'तुतारी' फुंकली, तर हा भाजपसाठी मोठा धक्का मानला जाऊ शकतो.

शिवाजीराव पाटील देवेंद्र फडणवीस ( Devendra Fadnavis ) यांचे अत्यंत निकटवर्तीय समजले जातात. कोल्हापुरात भाजपला गळती लागली आहे. त्यामुळे भाजप नेतृत्त्व कोल्हापूर जिल्ह्यात लक्ष देणार की नाही? असा सवाल सर्वसामान्य कार्यकर्त्यांकडून उपस्थित होत आहे. शिवाजीराव पाटील यांनी 'तुतारी' हाती घेतल्यास कोल्हापूर जिल्ह्यात पक्षाला लागलेली गळती थांबवण्यासाठी भाजपचे नेतृत्त्व कोणते पाऊल उचलणार? हे पाहावं लागणार आहे.

चंदगड विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादीकडून ( अजितदादा पवार ) भाजपला सहकार्य होत नसल्याचा आरोप यापूर्वी करण्यात आला होता. शिवाय भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये राष्ट्रवादीचे ( अजितदादा पवार ) आमदार राजेश पाटील यांच्याबद्दल नाराजी आहे. त्यामुळे भाजप नेतृत्त्वानं चंदगड विधानसभा मतदारसंघ आपल्याकडे घ्यावा. चंदगडमध्ये भाजप वाढवण्यासाठी पक्षश्रेष्ठीने लक्ष घालावे, अशा पद्धतीची भावना भाजप कार्यकर्त्यांची आहे. एकंदरीतच महायुतीमध्ये चंदगड विधानसभा मतदारसंघात सर्व काही आलबेल नसल्याचं चित्र यावरून दिसत आहे.

दरम्यान, चंदगडचे नेते, शिवाजीराव पाटील यांच्याशी 'सरकारनामा'ने संपर्क साधला असता ते म्हणाले, "याबाबत कोणताही विचार नाही. चंदगड विधानसभा मतदारसंघ भाजपला घेण्यासाठी आमचा प्रयत्न सुरू असणार आहे."

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT