Sushilkumar Shinde : माझ्या पहिल्या तिकिटासाठी विजयदादांनी शिफारस केली होती; सुशीलकुमार शिंदेंनी सांगितली आठवण

Karmala Assembly First Ticket : मला करमाळ्यातून विधानसभेचे तिकिट निश्चित झाले होते. पण, हायकमांडने तिकिट कापले. ज्या वेळी मी शरद पवारांना घ्यायला विमानतळावर गेलो, त्या वेळी त्यांचे डोळे डबलेले होते. त्यामुळे शरद पवार हे हळवे तेवढेच कणखरही आहेत
Sushilkumar Shinde-Sharad Pawar-Vijayshinh Mohite Patil
Sushilkumar Shinde-Sharad Pawar-Vijayshinh Mohite PatilSarkarnama
Published on
Updated on

Solapur, 29 September : माझ्या तिकिटाचा प्रश्न निर्माण झाला, तेव्हा विजयदादा हे सोलापूर जिल्हा परिषदेचे अध्यक्ष होते. त्या वेळी शरद पवारांनी ‘करमाळा मतदारसंघातून सुशीलकुमार शिंदे यांना तिकिट द्यावं, असं एक पत्र तुम्ही शिंदे यांना द्या, असं विजयदादांना सांगितलं होतं. त्यानुसार करमाळा मतदारसंघातील माझ्या पहिल्या उमेदवारीची पहिली शिफारस ही विजयसिंह मोहिते पाटील यांनी दिली होती. शरद पवार कदाचित हे विसरले असतील. पण मी विसरलो नाही, अशी आठवण माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी अकलूजच्या कार्यक्रमात सांगितली.

सुशीलकुमार शिंदे (Sushilkumar Shinde) यांचा 84 व्या वाढदिवसानिमित्त अकलूजमध्ये राज्यातील खासदारांचा सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता. त्या बोलताना शिंदे यांनी जुन्या आठवणींना उजाळा दिला. ते म्हणाले, मोहिते पाटील कुटुंबीयांनी माझा सत्कार समारंभ आयोजित केला आहे.

त्याला शरद पवार (Sharad Pawar) कारणीभूत आहे. कारण मी विजयदादांचा सत्कार करावा किंवा विजयदादांनी माझा सत्कार करावा, असं कार्यक्रमात झालं असेल. विशेष कार्यक्रम ठेवून सत्कार करावा, हे पवारांच्या सांगण्यावरून झालं आहे.

रणजितसिंह आणि धैर्यशील मोहिते पाटील यांना धन्यवाद देतो की सत्कार करायलाही मनं मोठं लागतं. तुम्हाला माहिती आहे की, मी आणि विजयदादा कधी ना कधी भांडलो आहे. पण, तेवढ्यापुरतं भांडलो. पुढे एकत्रित राहिलो. आम्ही दोघेही कधी एकमेकांच्या विरोधात बाह्या सावरून आलो नाही, असेही शिंदेंनी नमूद केले.

Sushilkumar Shinde-Sharad Pawar-Vijayshinh Mohite Patil
Sharad Pawar : शरद पवारांनी घेतली सुशीलकुमारांची फिरकी; ‘मी थोरलाय...आमच्या जास्त नादी लागू नका...!’

ते म्हणाले, शरद पवारांनीच मला राजकारणात आणले, नाही तर माझी काय हिम्मत होती. मी सब इन्स्फेक्टर माणूस. लांबून सॅल्यूट मारणारा. श्रीराम लेले नावाच्या माझ्या मित्राने मला शरद पवारांकडे नेले होते. त्यावेळी तुम्ही राजकारणात का येत नाही, असे त्यांनी मला विचारले. त्या वेळी मी योग्य परिस्थिती आल्यानंतर राजकारणात येणार आहे, असे सांगितले.

त्या वर त्यांनी योग्य परिस्थिती आली आहे, नोकरीचा राजीनामा द्या, असे फर्मान सोडले. त्याच दिवशी मी राजकारणात यावं असं ठरलं. मी पोलिस खात्यात असतानाच तो अर्ज भरून घेतला. कायद्याने तो भरता येत नाही. पण शरद पवारांचे सर्वच ठिकाणी वजन होतं, त्यामुळे डीसीपी जोग यांना आम्ही सुशीलकुमार शिंदे यांचा अर्ज घेतोय, असे सांगितले.

Sushilkumar Shinde-Sharad Pawar-Vijayshinh Mohite Patil
Ranjitsinh Mohite Patil : भाजप आमदार रणजितसिंह मोहिते पाटलांनी महाआघाडीच्या व्यासपीठावर हजेरी लावली अन्‌ भाषणही ठोकले!

डीसीपी जोग यांनी मला सल्ला देताना तुम्ही कर्तृत्वान आहात, राजकारणात पडू नका आणि काँग्रेसवाल्यांच्या तर बिल्कूल नादाला लागू नका, असे सांगितले होते. पण, मी नोकरी सोडण्याची भूमिका सांगितली आणि राजकारणात निघालो. मला करमाळ्यातून विधानसभेचे तिकिट निश्चित झाले होते. पण, हायकमांडने तिकिट कापले. ज्या वेळी मी शरद पवारांना घ्यायला विमानतळावर गेलो, त्या वेळी त्यांचे डोळे डबलेले होते. त्यामुळे शरद पवार हे हळवे तेवढेच कणखरही आहेत, असेही शिंदे यांनी नमूद केले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com