Mansing Khorate sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Chandgad Constituency : चंदगडमधून मानसिंग खोराटेंनी रणशिंग फुंकले! महाविकास आघाडी की अपक्ष?

Chandgad Vidhansabha Mansing Khorate : कोल्हापूरच्या चंदगड विधानसभा मतदारसंघातून दौलत कारखान्याचे चेअरमन मानसिंग कोराटे यांनी रणशिंग फुंकले आहे. महाविकास आघाडी की अपक्षाकडून लढणार?

Rahul Gadkar

Chandgad Constituency : चंदगड विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडी कडून उमेदवार कोण? याची उत्सुकता जिल्ह्याला लागली आहे. महाविकास आघाडीमध्ये यावरून स्पर्धा सुरू झाली आहे. ही जागा राष्ट्रवादी पवार गटाला जाणार असल्याने अनेकांनी उमेदवारीसाठी फिल्डिंग लावली आहे.

अशातच दौलतराव कारखान्याचे चेअरमन मानसिंग खोराटे यांनी स्वतःच्या उमेदवारीची घोषणा केली आहे. विद्यमान आमदार राजेश पाटील यांच्यावर निशाणा साधत आपण निवडणुकीच्या रिंगणात असणार अशी घोषणाच करून टाकली आहे.

कोल्हापूरच्या चंदगड विधानसभा मतदारसंघातून दौलत कारखान्याचे चेअरमन मानसिंग कोराटे यांनी रणशिंग फुंकले आहे. आज (शुक्रवारी) चंदगडमध्ये आपल्या गटाचा मेळावा घेऊन त्यांनी आपली उमेदवारी जाहीर केली आहे. दोन पक्षांकडून आपल्याला निवडणूक लढवण्यासंदर्भात विचारणा असल्याचं सांगत ही बोलणी पुढे गेली तर पक्षाकडून अन्यथा आपण अपक्ष ही निवडणूक लढवणार असल्याचं त्यांनी म्हटले आहे.

चंदगड विधानसभा मतदारसंघाला विकास अपेक्षित होता. मात्र, हा मतदारसंघ 40 वर्ष मागे गेला आहे. या ठिकाणी असणाऱ्या दोन एमआयडीसी आणि उद्योगधंदे परत गेले आहेत. त्यामुळे विकासाचा अजेंडा घेऊन आपण कोणत्याही परिस्थितीत ही निवडणूक लढवणारच असल्याचे कोराटे यांनी म्हटले

महाविकास आघाडीकडून आपल्याला काही ऑफर आली आहे का ? यावर विचारला असता मानसिंग कोराटे म्हणाले, राजकारणात काही गोष्टी बोलायच्या नसतात, असे महाविकास आघाडीकडून ऑफर असल्याचे संकेत दिले.

मतदारसंघात 1600 कोटी रुपयांची विकास कामं झाली, असा दावा विद्यमान आमदार राजेश पाटील करत असले तरी हा विकास फक्त कागदावरच असल्याचा आरोप देखील खराटे यांनी केला आहे. दरम्यान चंदगड विधानसभा मतदारसंघाची निवडणूक दौलत सहकारी साखर कारखान्या भोवतीच फिरते असा यापूर्वीचा अनुभव आहे. आता या कारखान्याचे चेअरमनच विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरल्यामुळे या मतदारसंघात तगडी लढत होणार हे स्पष्ट झालं आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT