Chandrahar Patil And Sanjay Raut Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Chandrahar Patil And Sanjay Raut : चंद्रहार पाटलांनी राऊतांची घेतली भेट; सांगलीत विधानसभेसाठी डाव टाकणार

Meeting of Chandrahar Patil and Sanjay Raut in Mumbai : गुरुपौर्णिमेनिमित्ताने शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे सांगलीतील नेते चंद्रहार पाटील यांनी खासदार संजय राऊत यांची मुंबईत भेट घेतली. यानंतर चंद्रहार पाटील यांनी शिवसेना ठाकरे पक्ष सांगलीमध्ये किती जागा लढवणार याची माहिती दिली.

Pradeep Pendhare

Mumbai News : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे सांगलीतील नेते चंद्रहार पाटील यांनी खासदार संजय राऊत यांची मुंबईत भेट घेतली. गुरुपौर्णिमेनिमित्ताने ही भेट असली, तरी यामागे सांगलीमधील विधानसभा निवडणुकीसाठी चंद्रहार पाटील डाव टाकणार असल्याचे संकेत मिळाले.

लोकसभा निवडणुकीच्या मैदानानंतर विधानसभा निवडणुकीत चंद्रहार पाटील कोणता डाव टाकणार आणि त्यांचे राजकीय गुरू संजय राऊत हे चंद्रहार पाटील यांना निवडणुकीच्या आखाड्यात यशस्वी ओपनिंगसाठी कोणता डाव शिकवणार याची उत्सुकता आहे.

विधानसभा निवडणुकीच्या तयारीला लागा, असा आदेश उद्धव ठाकरे यांनी शिवसैनिकांना दिला आहे. राज्यानुसार शिवसेना (Shiv Sena) ठाकरे पक्षाकडून चाचपणी सुरू आहे. सर्व्हे काढून अंदाज घेतला जात आहे. उद्धव ठाकरे यांचा सर्वात अगोदर लक्ष मुंबई असले, तरी राज्यात देखील निवडून येणाऱ्या जागांवर लक्ष ठेवून आहेत. सांगलीमध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष दोन जागा लढवणार असल्याचे संकेत मिळाले आहे. चंद्रहार पाटील यांनी मुंबईत खासदार संजय राऊत यांची भेट घेतल्यानंतर तशी माध्यमांना संकेत दिले. यात ते स्वतः देखील चाचपणी करत आहे. त्यामुळे खासदार राऊत यांची भेट गुरू-शिष्य असली, तरी त्यामागे राजकीय आखाडे होते, हे स्पष्ट झाले.

चंद्रहार पाटील यांनी सांगतील शिवसेना उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) पक्ष मिरज आणि आटपाडी या दोन जागा लढवणार असल्याचे सांगितले. विधानसभा निवडणुकीसाठी पक्षाने आदेश दिल्यार पुन्हा मैदानात उतरण्याची तयारी आहे. यश-अपयश राजकारणात येत असते. मात्र गुरूंनी लढण्याचा सल्ला दिला आहे, असे चंद्रहार पाटील यांनी म्हटले.

लोकसभा निवडणुकीत चंद्रहार पाटील यांचा सांगलीमधून पराभव झाला. सांगलीतील जागेवर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि काँग्रेसमध्ये घमासान झाले. महाविकास आघाडीत असून, देखील शिवसेना ठाकरे पक्ष आणि काँग्रेसमध्ये राजकारण तापले होते. विशाल पाटील यांनी काँग्रेसशी बंडखोरी करत निवडणुकीत अपक्ष उतरले. विशाल पाटील यांना शिवसेना ठाकरे पक्षाकडून उमेदवारी जाहीर झाली. या लढतीत चंद्रहार पाटील यांचा पराभव झाला आणि त्यांना तिसऱ्या क्रमांकाची मते मिळाली. विशाल पाटील यांनी विजयानंतर काँग्रेसला पाठिंबा जाहीर केला.

चंद्रहार पाटील आता पुन्हा विधानसभा निवडणुकीसाठी चाचपणी करत आहेत. लोकसभा निवडणुकीचा अनुभव पाहता चंद्रहार पाटील यांचे राजकीय गुरू संजय राऊत यांना पुन्हा सांगलीमध्ये विधानसभा निवडणुकीसाठी संधी मिळून देण्यात यशस्वी ठरणार का? हे पाहण्यासारखे असणार आहे. सांगलीमध्ये शिवसेनेने चंद्रहार पाटील यांना अनेकांना डावलून संधी दिली होती. त्यामुळे विधानसभेला चंद्रहार पाटील यांच्याबाबत नेमका निर्णय काय होता, याची उत्सुकता आहे. राज्यात शिवसेना ठाकरे पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाकडून इच्छुकांची मोठी संख्या आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT