Assembly Election 2024 : मोठी बातमी! भाजप 'एवढ्या' जागा लढण्याच्या तयारीत, शिंदे अन् अजितदादांचं काय?

Mahayuti : विधानसभेत भाजप मोठ्या भावाची भूमिका बजावण्याच्या तयारीत आहे. त्यासह मुख्यमंत्रिपदावरही भाजपचा डोळा असल्याचं सांगण्यात येत आहे.
ajit pawar devendra fadnavis eknath shinde.jpg
ajit pawar devendra fadnavis eknath shinde.jpgsarkarnama
Published on
Updated on

लोकसभेला संख्याबळ घटल्यानंतर विधानसभेत मोठ्या भावाची भूमिका बजावण्यासाठी भाजपनं कंबर कसली आहे. लोकसभेतील निकालांमुळे भाजपविरोधकांची ताकद वाढली आहे. त्यामुळे विधानसभा निवडणुकीत भाजप आणि महायुतीपुढे ( Mahayuti ) महाविकास आघाडीचे तगडे आव्हान असणार आहे.

राज्यातील बदललेली राजकीय परिस्थिती, भाजपविरोधी पक्षांची झालेली एकजूट, लोकसभा निवडणुकीतील धक्कादायक निकाल लक्षात घेता विधानसभा निवडणुकीत जास्तीत जास्त जागा जिंकण्याचे आव्हान भाजपच्या नेतृत्वापुढे आहे.

त्यामुळे येत्या विधानसभा निवडणुकीत 288 पैकी 155 ते 160 जागा लढविण्याच्या तयारीत भाजप आहे. याखाली एकही जागा कमी लढण्याच्या मनस्थितीत भाजप ( Bjp ) नाही, अशी माहिती समोर येत आहे. तर, उरणाऱ्या 128 ते 133 जागा अजितदादांच्या राष्ट्रवादीला आणि शिंदेंच्या शिवसेनेला दिल्या जातील, असंही सांगण्यात येत आहे.

2019 च्या विधानसभा निवडणुकीत भाजपचे 105 आमदार निवडून आले होते. अपक्ष आणि अन्य पक्षांनी पाठिंबा दिल्यानं भाजपची संख्या 115 पर्यंत गेली होती. शिवसेनेचे ( Shivsena ) 55 आमदार निवडून आले होते. पण, शिवसेनेच्या फुटीनंतर 40 आमदारांनी एकनाथ शिंदे यांना पाठिंबा दर्शवला. तसेच, राष्ट्रवादी काँग्रेसचे 53 आमदार विजयी झाले होते. त्यातील 39 आमदारांनी राष्ट्रवादीच्या फुटीनंतर अजितदादांसोबत जाण्याचा निर्णय घेतला.

2024 च्या विधानसभा निवडणुकीत अनेक विद्यमान आमदारांची विविध कारणांमुळे तिकीट कापली जाऊ शकतात. पण, ज्या पक्षांकडे ती जागा त्यांनाच त्या जागेवर उमेदवारी मिळाली पाहिजे, असा अट्टहास महायुतीतील तीनही पक्ष करत आहेत.

महायुतीतील कुठल्याही पक्षांनी कितीही दावा केला, तरी 160 च्या खाली एकही जागा कमी लढवायची नाही, अशी ठाम भूमिकाच भाजप नेत्यांनी दिल्लीत घेतली आहे. पण, दिल्लीतून 155 ते 160 जागांच्या मध्ये हिरवा कंदील मिळण्याची शक्यता आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेनं 100 आणि अजितदादांच्या राष्ट्रवादीनं 70 जागांवर दावा केला आहे. पण, शिंदेंच्या शिवसेनेला 80 ते 90 आणि उर्वरित जागा अजितदादांची राष्ट्रवादी व मित्रपक्षांना दिल्या जातील. अशी स्थिती झाली, तर स्वतंत्र निवडणूक लढण्याचा विचार अजितदादांच्या राष्ट्रवादीत सुरू आहे.

मुख्यमंत्रिपदाचा चेहरा कोण?

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याच नेतृत्वाखाली विधानसभा निवडणूक लढणार असल्याचं भाजपनं स्पष्ट केलं आहे. पण, भाजपनं कधीही कुणाचेही नाव घेऊन विधानसभा निवडणुका लढल्या नाहीत. स्वबळावर सत्ता असलेल्या किंवा युती असलेल्या राज्यांत भाजप कधीही मुख्यमंत्रिपदाचा चेहरा जाहीर करून निवडणुकांना सामोरं गेला नाही. त्यामुळे महाराष्ट्रातंही भाजप मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करणार नाही, असं सांगण्यात येत आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com