Vishal Patil, Jayant Patil, Chandrahar Patil  Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Sangli Politics : सांगली महाविकास आघाडीत ठिणगी; आधीच काँग्रेस-शरद पवार गटात धुसफूस; आता ठाकरे गटाने तेल ओतले

Vishal Patil Vs Jayant Patil Vs Chandrahar Patil : विधानसभेच्या पार्श्वभूमीवरही आता काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पावर पक्षात वाद हेवेदावे सुरू झाले आहेत. त्यातच ठाकरे गटानेही आघाडीत नवे आव्हान दिले आहे.

Sunil Balasaheb Dhumal

Sangli Political News : सांगली जिल्ह्यात खासदार विशाल पाटील यांनी विश्वाजीत कदम यांच्या उपस्थितीत शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटलांना विधानसभा निवडणुकीसाठी आव्हान दिले आहे. त्यामुळे महविकास आघाडीत घमासान होणार अशी शक्यता वर्तवली जात असतानाच ठाकरे गटाच्या चंद्रहार पाटील यांनीही तेल ओतले. त्यामुळे सांगलीत जागा वाटपावरून आघाडीत मोठी चुरस होण्याची शक्यता आहे. यातून वरीष्ठ मंडळी कसा मार्ग काढणार याकडे लक्ष आहे.

लोकसभा निवडणुकीनंतर राज्यात विधानसभेचे वारे वाहू लागले आहे. सांगलीत लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीत उमेदवारीवरून बेबनाव झाला होता. आता विधानसभेच्या पार्श्वभूमीवरही आता काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पावर पक्षात वाद हेवेदावे सुरू झाले आहेत. त्यातच ठाकरे गटानेही आघाडीत नवे आव्हान उभे केले आहे. त्यामुळे सांगलीत जागा वाटप करताना महाविकास आघाडीतील ज्येष्ठ नेत्यांची मोठी पंचायत होण्याची शक्यता आहे.

विशाल पाटील Vishal Patil यांनी शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या इस्लामपूर-वाळवा विधानसभा मतदारसंघाकडे आपले विशेष लक्ष असल्याचे विधान केले. त्याच स्टेजवर विश्वजीत कदम यांनीही जयंत पाटील यांना इशारा दिला आहे. परिणामी सांगलीतील विधानसभांच्या जागांवरुन काँग्रेस आणि शरद पवार गटात वादाची ठिणगी पडल्याचे बोलले जाते. त्यात आता चंद्रहार पाटलांनीही दोन जागांवर दावा सांगितला आहे.

सांगली लोकसभा निवडणुकीतील ठाकरे गटाचे उमेदवार चंद्रहार पाटील Chandrahar Patil यांनी विधानसभेत दोन जागा लढवणारच, अशी ठाम भूमिका मांडली आहे. खानापूर-मिरज विधानसभा मतदारसंघ शिवसेना ठाकरे गट लढवणारच, असे त्यांनी स्पष्ट करून महाविकास आघाडीत नव्याने आव्हान निर्माण केले आहे.

चंद्रहार पाटलांनी काँग्रेसला इशाराही दिला आहे. राज्यात उद्धव ठाकरे यांच्या प्रामाणिक कष्टामुळे काँग्रेसला एका जागेवरून थेट 13 खासदारांवर नेले आहे. तर शरद पवार गटाच्या ४ वरून 8 जागा निवडून आल्या आहेत. सांगलीत मात्र काँग्रेस आणि राष्ट्रवादीने गद्दारी केली. आता विधानसभेतही पुन्हा गद्दारी कराल तर राज्यात किंमत मोजावी लागेल, असा थेट इशारा चंद्रहार पाटील यांनी दिला.

(Edited by Sunil Dhumal)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT