Pankaja Munde : पंकजा मुंडे रडल्या! म्हणाल्या, '...मी राजकारण सोडून देईन'

Pankaja Munde BJP : पंकजा मुंडे यांनी आपल्या समर्थकांना आत्महत्या करू नका, तर मला लढण्यासाठी बळ द्या, असे आवाहन केले आहे.
Pankaja Munde
Pankaja Mundesarkarnama
Published on
Updated on

Pankaja Munde News : बीड लोकसभा मतदारसंघात पंकजा मुंडे यांचा पराभव झाल्यानंतर आत्महत्यांचे सत्र सुरू झाले आहे. पंकजा मुंडे यांच्या समर्थक 4 जणांनी आपले जीवन संपले आहे. चिंचवडी येथील आत्महत्या केलेल्या युवकाची घरी पंकजा मुंडे या गेल्या होत्या. यावेळी नातेवाईकांचा आक्रोश पाहून पंकजा मुंडे देखील रडल्या.

पंकजा मुंडे यांनी आपल्या समर्थकांना आत्महत्या करू नका, तर मला लढण्यासाठी बळ द्या, असे आवाहन केले आहे. जर आत्महत्या थांबल्या नाही तर मी राजकारण सोडून देईल, अशी भावनिक साद देखील घातली.

पंकजा मुंडे Pankaja Munde यांनी आपल्या समर्थकांना 100 दिवस थांबण्याची विनंती केली आहे. आगामी 100 दिवसांत हे सगळे चित्र बदलून टाकू, असे देखील पंकजा मुंडे यांनी म्हटले आहे. लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादीचे (शरद पवार गट) उमेदवार बजरंग सोनवणे यांच्याकडून पंकजा मुंडेंना पराभव स्वीकारावा लागला होता.

Pankaja Munde
Eknath Shinde News : ईव्हीएमबाबत मुख्यमंत्र्यांनी वायकरांची बाजू घेत विरोधकांवर सोडला 'बाण'

पंकजा मुंडे या चिंचेवाडी येथे असताना त्यांच्या अजून एका समर्थकाने पराभव जिव्हारी लागल्याने आत्महत्या केली. बीडमधील शिरुर कासार तालुक्यातील वारणी येथे आज (रविवारी ) ही घटना घडली. गणेश उर्फ हरिभाऊ भाऊसाहेब बडे असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे.

पंकजा मुंडे यांनी आज चिंचेवाडी आत्महत्या केलेल्या तरुणाच्या परिवाराची भेट घेतली. तर, दोन दिवसांपू्र्वी धनंजय मुंडे यांनी देखील आत्महत्या केलेल्या दोन तरुणांच्या परिवारची भेट घेत त्यांचे सांत्वन केले. तसेच त्या कुटुंबातील मुलांच्या शिक्षणाची जबाबदारी स्वीकारली.

Pankaja Munde
Babanrao Lonikar : महाविकास आघाडी सरकार पांढऱ्या पायाचे त्यांच्यामुळेच मराठा आरक्षण गेले; भाजप नेत्याचा अजब दावा

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com