Kolhapur News : कोल्हापूर जिल्ह्यात भाजपचा अंतर्गत वाद चव्हाट्यावर आल्यानंतर भाजपच्या जुन्या पदाधिकाऱ्यांनी थेट उच्च शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील आणि भाजपचे नेते समरजितसिंह घाटगे यांना टार्गेट केले आहे. मंत्री पाटील यांनी नव्या पदाधिकाऱ्यांची नियुक्ती करून त्यांना आमच्या डोक्यावर बसवले, तर समरजितसिंह घाटगे हे जिल्हाध्यक्ष झाल्यापासून जिल्ह्यातील पक्ष मोडकळीस निघाला आहे, असा आरोप माझी संघटन मंत्री बाबा देसाई यांनी केला. (Latest Marathi News)
जुन्या पदाधिकाऱ्यांनी थेट मंत्र्यांच्यावरच निशाणा साधल्याने भाजपच्या गोटात खळबळ उडाली आहे. एकीकडे असे चित्र असताना जुने पदाधिकारी वर्षभर गप्प का होते, असा सवालही उपस्थित होत आहे. प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत बावनकुळे यांच्या आरोपाकडे काणाडोळा करणार का? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
जुन्या कार्यकर्त्यांना कार्यकारिणी निवडीत नगण्य स्थान दिले गेले आहे. जे पक्षाशी एकनिष्ठ लोकं नाहीत, ते पदाधिकारी बनले आहेत. नवीन कार्यकारिणी निवड रद्द करून जिल्ह्यात यावे, अशी विनंती प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांना केली असल्याचे माझी संघटन मंत्री बाबा देसाई यांनी सांगितले. जर मागणी मान्य नाही झाल्यास पुढील निर्णय कार्यकर्त्यांची बैठक घेऊन ठरवू, आमचं आयुष्य मातीत घालून पक्ष उभा केला, हा पक्ष मोडीत काढण्याचे कामं अनेकांचे सुरू आहे, असा आरोपही बाबा देसाई यांनी केला.
भारतीय जनता पक्षाची ताकद दिवसेंदिवस वाढत आहे. मोठ्या संख्येने कार्यकर्ते पक्षाकडे आकर्षित होत आहेत. दरम्यान, पदावरून पक्षांमध्ये काहीजण नाराजी व्यक्त करत आहेत, त्यांची नाराजी निश्चितच दूर करू, सगळेजण भाजपसोबत असतील. ज्यांना काम करायचे आहे, त्यांना पदे देऊ. पद मागणं म्हणजे जिवंतपणाचे लक्षण आहे," अशा शब्दांत खासदार धनंजय महाडिक यांनी जिल्ह्यातील भाजप अंतर्गत घडामोडींवर भूमिका मांडली.
(Edited By - Chetan Zadpe)
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.