Udayanraje & Chandrakant Patil Latest news
Udayanraje & Chandrakant Patil Latest news  Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

चंद्रकांतदादांची उदयनराजेंना विनंती; म्हणाले, राज्यपाल कोश्यारी बोलण्यात चुकले असतील, मात्र...

सरकारनामा ब्यूरो

पुणे : शिवरायांचा अपमान कोणी केलेला आणि करूही शकत नाही. छत्रपती शिवाजी महाराजांमुळे आपण येथे उभे आहोत. महाराजांचा अपमान राज्यपालांनी केलाय, असा आरोप तुम्ही करताय, परंतु ते शिवनेरी गडावर पायी गेले. संजय राऊत (Sanjay Raut) गेले नाहीत ते हॅलीकोप्टरने गेले होते. हिम्मत असेल तर शिवनेरीच्या पायऱ्या चढून दाखवा,असे थेट आव्हान भाजपचे नेते आणि राज्याचे मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले. (Udayanraje & Chandrakant Patil Latest news )

चंद्रकांत पाटील म्हणाले, "जे राज्यपाल या वयात शिवनेरीवर पायी गेले त्याच्या मनात शिवरायांबद्दल कसा अनादर असेल. का तुम्ही समाजामध्ये तेढ निर्मण करताय.मी त्यांच्या बोलण्याचे समर्थन करत नाही. मात्र, या लेवलच्या माणसाने स्क्रिप्ट करून बोललं पाहिजे. बोलल्यावर मला असं म्हणायचं नव्हतं, असं म्हणून चालत नाही,अशा शब्दात त्यांनी राज्यपालांनाही सल्ला दिला आहे.

पुढे ते म्हणाले, ज्या माणसाच्या मनामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल इतका आदर आहे. त्या व्यक्तीच्या एका वाक्याने इतके दिवस गदारोळ होत आहे. उदयनराजे छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज आहेत.आमचेही आदरणीय आहेत. श्रीमंत छत्रपती उदयनराजे याच्याशिवाय त्यांचा उल्लेखं करण बरोबर नाही.माझी उदयनराजेंना हात जोडून विनंती आहे की, ज्या राज्यपालांनी न सांगता शिवनेरीवर जाऊन छत्रपती शिवाजी महाराजांचे दर्शन घेतले, त्यांच्याकडून बोलण्यामध्ये एखादी गोष्ट चुक झाली असेल तर, हा विषय आता कुठेरी संपवावा लागेल, असे आवाहन त्यांनी केले.

दरम्यान, अजित पवार यांनी सरकार जाणार याबाबत केलेल्या विधानावर देखील त्यांनी आपली प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले, अजित पवार हे भविष्यकर्ते आहेत. त्यामुळे त्यांना सरकार जाणार हे कळल्यामुळे घाईघाईने पुणे जिल्ह्याच्या नियोजनामध्ये निम्या पैशांच्या प्रशासकीय मान्यता देऊन टाकल्या. कारण त्यांना भविष्य कळतं. आधी सरकार जाणार की राज्यपाल हे त्यांना कळतं,असा खोचक टोला देखील पाटीलांनी अजित पवारांना (Ajit Pawar)लगावला. शिवाय उद्धव ठाकरेंच्या महिला मुख्यमंत्र्याच्या वक्तव्यावर बोलण मात्र त्यांनी टाळलं.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT