उदयनराजे संतापले; म्हणाले, एका एकाची मुंडकी छाटावीशी वाटतात...

Udayanraje : उदयनराजेंचा राज्यकर्ते व सत्ताधार्‍यांवर निशाणा...
Udayanraje Latest News
Udayanraje Latest NewsSarkarnama

सातारा : एवढा संताप आलाय की तलवारीने एका एकाची मुंडकी छाटावीशी वाटतात, असा संताप भाजपचे खासदार उदयनराजे भोसले यांनी व्यक्त केला आहे. \

रायगडावर आक्रोश आंदोलन करण्यासाठी उदयनराजे आज (ता.२ डिसेंबर) रवाना झाले. यावेळी त्यांनी जलमंदिर पॅलेस निवासस्थानी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी उदयनराजे यांनी छत्रपती शिवरायांच्या अवमानप्रकरणी राज्यकर्ते व सत्ताधार्‍यांवर निशाणा साधला. (Udayanraje Latest News)

Udayanraje Latest News
Udayanraje : नरेंद्र पाटलांची बुद्धी भ्रष्ट झाली असेल…

रायगडला (Raigad) जाण्यापूर्वी जलमंदिर पॅलेस निवासस्थानी छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला अभिवादन करून त्यांनी प्रवासाला सुरुवात केली. यावेळी उदयनराजेंनी राज्यकर्त्यांवर नाव न घेता संताप व्यक्त केला. मला कोणाचा फोन आला नाही. मला कोणाची परवा नाही, असे वाटत असून एका एकाची मुंडकी छाटावी वाटतात, अशा शब्दात उदयनराजेंनी संताप व्यक्त केला. रायगडावर जाण्यासाठी उदयनराजे (Udayanraje) यांच्या जलमंदिर या निवासस्थानी शेकडो शिवभक्त पाठिंबा देण्यासाठी उपस्थित होते.

Udayanraje Latest News
Ajit Pawar: अजितदादांनी राज ठाकरेंना करून दिली 'त्या' मुलाखतीची आठवणं...

दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल भाजप नेते आणि राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी केलेल्या टिपण्णीमुळे विरोधकांनी भाजपवर (BJP) टिकेची झोड उडवली आहे. दरम्यान, उदयनराजेंनी देखील यावरून आपली जाहीर नाराजी बोलून दाखवली आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com