kolhapur News : राज्याचे उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर कोल्हापूर भाजपमधून आरोप झाले. त्यानंतर पक्षातील अंतर्गत वाद चव्हाट्यावर आला होता. नव्या कार्यकारिणी निवडीवरून कोल्हापूर, आजरा, गडहिंग्लज, शिरोळ तालुका भाजपमधील वाद उफाळून आला होता. या वादाचं खापर माजी संघटन मंत्री बाबा देसाई यांनी मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर फोडलं होतं. अखेर मंत्री चंद्रकांत पाटील यांनी कोल्हापुरात येऊन जुन्या कार्यकर्त्यांची भेट आणि समजूत काढून वाद संपुष्टात आणण्याचा प्रयत्न केला. (Chandrakant Patil meet disgruntled BJP loyalists in Kolhapur)
जुलै २०२३ मध्ये संपूर्ण महाराष्ट्रात भारतीय जनता पक्षाच्या अंतर्गत निवडणूक प्रक्रिया पूर्ण होऊन राज्यातील सर्व ठिकाणी जिल्हाध्यक्ष नियुक्ती करण्यात आले होते. त्यानंतर जिल्हाध्यक्षांनी आपली जिल्हा कार्यकारिणी जाहीर केली होती. या नूतन कार्यकारिणीबद्दल काही ठिकाणी जिल्ह्यातील माजी पदाधिकाऱ्यांनी नाराजी व्यक्त केली होती.
या पार्श्वभूमीवर आज कोल्हापूर दौऱ्यावर आलेले चंद्रकांत पाटील यांनी भाजप जिल्हा कार्यालयात तालुकानिहाय माजी पदाधिकाऱ्यांची भेट घेऊन त्यांची भूमिका समजून घेतली. तालुका स्तरावर राजकीय पार्श्वभूमी समजून घेऊन, जुन्या आणि नव्यांचा समन्वय साधत सर्वच तालुक्यातील पदाधिकाऱ्यांच्या भेटीमध्ये सकारात्मक चर्चा केली.
आगामी काळात या पदाधिकाऱ्यांना नूतन कार्यकारिणीमध्ये सामावून घेण्याचे आश्वासन चंद्रकांत पाटील यांनी या वेळी दिले. पक्ष वाढत असून, कार्यकर्ते पक्षाकडे आकर्षित होत आहेत, अशा सर्वांना एकत्र घेऊन आपल्या अनुभवाच्या आधारे सर्वांनी पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी मतभेद न ठेवता एकत्र येऊन एकदिलाने कार्यरत राहिले पाहिजे, असेही चंद्रकांत पाटील यांनी सांगितले.
चंद्रकांत पाटलांवर काय आरोप होता?
कोल्हापूर जिल्ह्यात भाजपचा अंतर्गत वाद चव्हाट्यावर आल्यानंतर पक्षाच्या जुन्या पदाधिकाऱ्यांनी थेट उच्च शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील आणि भाजपचे जिल्हाध्यक्ष समरजितसिंह घाटगे यांना टार्गेट केले होते. मंत्री पाटील यांनी नव्या पदाधिकाऱ्यांची नियुक्ती करून त्यांना आमच्या डोक्यावर बसवले. समरजितसिंह हे जिल्हाध्यक्ष झाल्यापासून कोल्हापुरातील पक्ष मोडकळीस आला आहे, असा आरोप माजी संघटन मंत्री बाबा देसाई यांनी केला होता.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.