Mumbai News : काँग्रेसचे माजी खासदार मिलिंद देवरा हे राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटात प्रवेश करणार असल्याची चर्चा रंगली आहे. कारण खासदार प्रफुल्ल पटेल आणि देवरा यांची दोन वेळ भेट झाल्याचे सांगितले जात आहे. त्यातच महाविकास आघाडीच्या समीकरणामुळे देवरा यांची कोंडी होण्याची शक्यता आहे, त्यामुळे देवरा यांच्या राष्ट्रवादी प्रवेशाच्या चर्चेला उधाण आले आहे. (Milind Deora Will join NCP-Ajit Pawar Group?)
मिलिंद देवरा काँग्रेसचे माजी खासदार आहेत. खरं तर देवरा कुटुंबीय हे पारंपारिक काँग्रेस विचाराचे आहेत. त्यांचे वडिल मुरली देवरा हे दक्षिण मुंबईचे खासदार होते. तसेच, मिलिंद देवरा हे मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष होते. दक्षिण मुंबईतून ठाकरे गटाचे अरविंद सावंत हे निवडून आले आहेत. त्यामुळे जागा वाटपात देवरा यांचं काय होणार, असा प्रश्न निर्माण झाला आहे.
या पार्श्वभूमीवर मिलिंद देवरा आणि खासदार प्रफुल्ल पटेल यांच्यामध्ये दोन भेटी झाल्याची चर्चा आहे. त्यामुळेच देवरा हे राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाटेवर असल्याची चर्चा रंगली आहे. याबाबत मिलिंद देवरा म्हणाले की, माझे आणि प्रफुल्ल पटेल यांचे जुने संबंध आहेत. आमच्या दोघांची भेट म्हणजे राजकीय पक्ष प्रवेश नाही. राष्ट्रवादीत जाण्याच्या चर्चांमध्ये तथ्य नाही, असे स्पष्टीकरण देवरा यांनी दिले आहे.
उदय सामंत म्हणतात देवरांचे स्वागत करू
माध्यमांशी बोलताना उद्योगमंत्र्यांना एका पत्रकाराने मिलिंद देवरा यांच्या प्रवेशाबाबत होत असलेल्या चर्चेबाबत प्रश्न विचारला त्यावेळी सामंत यांनी वरील उत्तर दिले आहे. ते म्हणाले की, मिलिंद देवरा हे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आले तर त्यांचे स्वागतच होईल. कारण, देवरा यांच्यासारखा मोठ्या नेत्याच्या मनात काँग्रेस (मला माहीत नाही ते सोडणार आहे की नाही ते) पक्ष सोडण्याचा विचार असेल तर त्यांचे सगळेच लोक स्वागत करतील. आम्ही देखील त्यांचे स्वागत करू.
अजित पवारांची पाठराखण
माजी पोलिस आयुक्त मीरा बोरवणकर यांच्या आरोपाबाबत बोलताना उदय सामंत यांनी अजित पवारांची पाठराखण केली. मीरा बोरवणकर यांनी पुस्तकात काय लिहिले आहे, हे मी वाचले नाही. तसंच त्यांनी लिहिलं आहे, म्हणून मी माझं मत बोलणं योग्य नाही. अजितदादा हे आजही पुण्याचे पालकमंत्री असून एक सक्षम उपमुख्यमंत्री काम करीत आहेत. कुठची जमीन घेऊन त्यावर विकास करण्याची मानसिकता त्यांची असेल असं मला वाटत नाही. त्यामुळे बोरवणकर यांनी लिहिले आहे, ते पहिलं वाचायला पाहिजे. या प्रकरणावर मी बोलण्यापेक्षा अजित पवार किंवा त्यांचे कार्यालय खुलासा करेल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.