Meera Borwankar News : माजी पोलिस आयुक्तांच्या आरोपामुळे ‘दादा’ अडचणीत

Pune Land case : आधीच लिलाव झाला होता, तर माझ्या अगोदरच्या आयुक्तांनी पुढची प्रक्रिया का केली नाही?
Meera Borwankar
Meera Borwankar Sarkarnama

Pune News : माजी पोलिस आयुक्त मीरा बोरवणकर यांनी ‘मॅडम कमिशनर’ या पुस्तकात केलेल्या काही उल्लेखामुळे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. बोरवणकर यांनी पवार यांच्या नावाचा उल्लेख केला नसला, तर पालकमंत्री आणि एका ठिकाणी कंसात दादा असा उल्लेख केल्याने अजित पवारांकडे अंगुलीनिर्देश होत आहे. ('Dada' in trouble due to former police commissioner's allegation)

येरवडा परिसरातील पोलिस दलाची जागा एका खासगी विकसकाला देण्याबाबतचा विषय होता. त्याला तत्कालीन आयुक्त बोरवणकर यांनी नकार दिला होता. त्या भूखंडावरूनच बोरवणकर यांनी आरोप केले आहेत. पुण्याचे पालकमंत्री भाजपकडून अजित पवारांकडे येताच नवा वाद उभा राहिला आहे.

Meera Borwankar
Mumbai NCP : शरद पवार गटाची निवडणूक मोर्चेबांधणी; मुंबईचे अध्यक्षपद सोपविणार एकनिष्ठ महिला नेत्याकडे!

मीरा बोरवणकर यांनी पुस्तकात म्हटले आहे की, पुण्याचे पोलिस आयुक्त झाल्यानंतर मी वेगवेगळ्या अधिकाऱ्यांना भेटत होते. तसेच, आसपासच्या पोलिस ठाण्यांतील गुन्ह्यांचा आढावा घेतला होता. पुण्याच्या विभागीय आयुक्तांचा मला एके दिवशी फोन आला आणि त्यांनी सांगितले की, पुण्याचे पालकमंत्री तुमच्याबद्दल विचारत आहेत. तुम्ही त्यांना एकदा भेटावं. येरवडा पोलिस ठाण्याच्या जमिनीसंदर्भातील असल्याचे विषय असल्याचेही त्यांनी मला त्यावेळी स्पष्ट केले होते.

Meera Borwankar
Shivsena Vs BJP : मुख्यमंत्र्यांच्या ठाण्यात भाजपचे डावपेच; हजार ‘सुपर वॉरियर्सं'ना बावनकुळे देणार कानमंत्र

विभागीय आयुक्तांच्या कार्यालयातच मी पालकमंत्र्यांची भेट घेतली. त्यावेळी पालकमंत्र्यांकडे येरवडा पोलिस ठाणे परिसराचा नकाशाही होता. त्यावेळी पालकमंत्र्यांनी मला सांगितलं की, या जागेचा लिलाव झालेला आहे आणि जादा बोली लावणाऱ्यांसोबत जमीन हस्तांतरणाची प्रक्रिया पार पाडावी. त्यावर मी माझं म्हणणं मांडलं. येरवडा हे पुण्याचे मध्यवर्ती ठिकाण आहे. भविष्यात अशा प्राईम ठिकाणी जागा मिळणार नाही. तसेच, कार्यालये आणि पोलिस अधिकारी-कर्मचाऱ्यांसाठी आपल्याला क्वार्टर्स बांधण्यासाठी पोलिस दलाला या जागेची गरज आहे, असे मी पालकमंत्र्यांना स्पष्ट केले.

आयुक्तपदाचा कार्यभार मी नुकताच हाती घेतला आहे. अशा वेळी सरकारी जमीन खासगी व्यक्तीला दिल्यास माझ्याकडे चुकीच्या नजरेने पाहिले जाईल, पण संबंधित मंत्र्याने काही एक न ऐकता जमीन हस्तांतराची प्रक्रिया करण्याचा आग्रह धरला. मी त्यावेळी त्यांना विचारलेसुद्धा की आधीच लिलाव झाला होता, तर माझ्या अगोदरच्या आयुक्तांनी पुढची प्रक्रिया का केली नाही? तसेच पोलिसांसाठीची जमीन एका खासगी व्यक्तीला देणं, योग्य नसल्याचं माझं मत मी मांडलं. तसेच ते करणं मला शक्य नाही, असेही मी स्पष्ट केले.

Meera Borwankar
Maratha Reservation : प्रस्थापित मराठे ७० वर्षे गांजा ओढत होते, की गोट्या खेळत होते?; खोतांचा निशाणा कुणावर?

माझं म्हणणं ऐकल्यानंतर त्या मंत्र्याने हातातील नकाशा टेबलवर भिरकावला. त्याचवेळी त्यांनी तत्कालीन गृहमंत्री आर. आर. पाटील यांच्याविषयी अनेक अपशब्द वापरले. मी मात्र त्यांना सॅल्यूट करून निघून गेले. तत्कालीन गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी त्यानंतर एक बैठक बोलावली. मी कोणत्याही पद्धतीने बधत नाही, हे पाहून पाटील यांनीही त्यांची भूमिका बदलून गृहखातं हे जागा हस्तांतर करायला तयार नाही. आर. आर. पाटील यांनी मला नेहमीच पाठिंबा दिला होता. मात्र, येरवडा जमिनीच्या प्रकरणात ते पालकमंत्र्यांच्या दबावाखाली दिसत होते. एका वरिष्ठ अधिकाऱ्याने मला सांगितले की, दादांना (हा शब्द कंसात लिहिण्यात आलेला आहे) नाही म्हणायची कुणाची हिम्मत नसते.

Meera Borwankar
Rajendra Shingne News: पवारांचे निष्ठावंत शिंगणे आता म्हणतात, 'दादां'ना मुख्यमंत्री होण्यापासून 'काका'ही रोखू शकत नाहीत

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com