madhavrao ghatge chandrakant patil sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Chandrakant Patil News : चंद्रकांतदादांनी भरसभेत शिरोळमधील माधवराव घाटगेंना दिली आमदारकीची ऑफर, पण...

Madhavrao Ghatge News : शिरोळ मतदारसंघाचा आमदार करण्यात माधवराव घाटगेंची भूमिका मागच्या दोन निवडणुकीत निर्णायक राहिली आहे.

Rahul Gadkar

Kolhapur News : हातकणंगले लोकसभा मतदारसंघातील ( Hatkanangale Lok Sabha Election 2024 ) शिरोळमध्ये शुक्रवारी ( 20 एप्रिल ) भाजप कार्यकर्त्यांचा मेळावा पार पडला. या मेळाव्याला राज्याचे उच्च आणि तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील ( Chandrakant Patil ) यांची उपस्थिती होती. या मेळाव्यात त्यांनी शिरोळ तालुक्यातील बहुजन विकास आघाडीचे नेते व गुरुदत्त साखर कारखान्याचे अध्यक्ष माधवराव घाटगे ( Madhavrao Ghatge ) यांना शिरोळ विधानसभा मतदारसंघांचे भावी आमदार होण्याची ऑफर देऊन खळबळ उडवून दिली.

"घाटगे यांची जनमानसात ओळख चांगली आहे. नेहमीच कोणत्या पदाची अपेक्षा न ठेवता हा माणूस इतरांसाठी धडपडतोय. शिरोळ मतदारसंघातून तुम्ही आमदार व्हा," अशी ऑफरच चंद्रकात पाटील ( Chandrakant Patil ) यांनी दिली.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

"चंद्रकांत पाटलांच्या माध्यमातून शिरोळसाठी 77 कोटींचा आणि तालुक्याला महापुराचा फटका लक्षात घेता, पाणी मराठवाड्यात वळविण्यासाठी 3200 कोटींचा निधी मंजूर झाला," असं माधवराव घाटगे यांनी सांगितलं. यानंतर मंत्री चंद्रकांत पाटील आणि माजी आमदार सुरेश हाळवणकर ( Suresh Halvankar ) यांनी तो संदर्भ घेऊन, "माधवराव, आता तुम्हीच आमदार व्हा," अशी खुली ऑफर दिली.

त्यावर माधवराव घाटगे यांनीदेखील तत्परतेने उत्तर देत चंद्रकांत पाटील यांच्या ऑफरला नकार दिला. "मला राजकारणात पडायचे नाही. माझा साखर उद्योग बरा आहे," असे सांगत माधवराव घाटगे यांनी ऑफर धुडकावली.

शिरोळ मतदारसंघाचा आमदार करण्यात माधवराव घाटगेंची भूमिका मागच्या दोन निवडणुकीत निर्णायक राहिली आहे. शिरोळ मतदारसंघातून शिवसेनेचे ( शिंदे गट ) सहयोगी आमदार राजेंद्र पाटील-यड्रावकर आमदार आहेत. पाटील-यड्रावकर आणि घाटगे यांच्यात विकासकामांचे उद्घाटन करण्यावरून मध्यंतरी संघर्ष झाला आहे. या लोकसभा निवडणुकीत पाटील-यड्रावकर नाराज दिसले. मात्र, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आमदार पाटील-यड्रावकर यांच्या घरी जाऊन त्यांना प्रचारासाठी सक्रिय केले आहे. असे असताना चंद्रकांत पाटील यांनी शिरोळमध्ये येऊन ऑफर दिल्याने त्याची वेगळी चर्चा जिल्ह्यात आहे.


( Edited By : Akshay Sabale )

R

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT