Chandrakant Patil News : चंद्रकांत पाटलांच्या सभेत शेतकऱ्याला धक्काबुक्की; जाब विचारणाऱ्याला...

Bjp News : माढा लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या प्रचारार्थ टेंभुर्णी येथे आयोजित करण्यात आलेल्या भाजप कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात एका शेतकऱ्याने शेती धोरणासंदर्भात प्रश्न विचारल्याने एकच गोंधळ उडाला.
Madha Farmer
Madha Farmer Sarkarnama

Solapur News : आगामी काळात होत असलेल्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील वातावरण चांगलेच तापले आहे. सत्ताधारी व विरोधक एकमेकांवर आरोप करण्याची एकही संधी सोडत नाहीत. माढा लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या प्रचारार्थ टेंभुर्णी येथे आयोजित करण्यात आलेल्या भाजप कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात एका शेतकऱ्याने शेती धोरणासंदर्भात प्रश्न विचारल्याने एकच गोंधळ उडाला. सोलापूरचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी भाजप नेत्यांना शेती प्रश्नासंदर्भात जाब विचारणाऱ्या या शेतकऱ्याला पोलिसांनी सभेतूनबाहेर काढले.

माढा लोकसभा (Madh Lok Sabha) मतदारसंघातील महायुतीच्या (Mahayuti) माढा तालुक्यातील टेंभुर्णी येथे झालेल्या समन्वय बैठकीत शेतकऱ्याने कांदा आणि शेतीप्रश्नावरुन पालकमंत्री चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) आणि भाजप नेत्यांना जाब विचारला, त्यामुळे बैठकीत एकच गोंधळ उडाला. (Chandrakant Patil News)

Madha Farmer
Raj Thackeray News : मनसैनिकांचे 'कन्फ्यूजन पे कन्फ्यूजन'; राज ठाकरेंच्या नव्या भूमिकेने कोंडी !

या दरम्यान भाजप पदाधिकाऱ्यांनी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्यासमोर शेतकऱ्याला धक्काबुक्की केल्याचा प्रकार घडला. तसेच, पोलिसांनी या शैतकऱ्याला सभेतून बाहेर काढले. या गोंधळामुळे मंत्री चंद्रकांत पाटील यांना भाषण गुंडाळावे लागले.

टेंभुर्णी येथे बुधवारी दुपारी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत भाजप पदाधिकाऱ्यांचा मेळावा होता. या मेळाव्यात पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांचे भाषण सुरू असतानाच टेंभुर्णी येथील शेतकरी संपतराव काळे यांनी आपले आयुर्वेदिक वनस्पती लागवडीमध्ये २२ लाख रुपयांचे नुकसान झाले आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

केंद्र सरकारने परवानगी दिलेल्या कंपनीमुळे हा तोटा झाला आहे. याला केंद्र सरकार जबाबदार आहे, असा आरोप केला. तसेच, कांद्याचा प्रश्नही त्यांनी मांडला. त्यामुळे कार्यक्रम स्थळी एकच गोंधळ उडाला. त्यानंतर मंत्री चंद्रकांत पाटील यांनी आपले भाषण थांबवले.

यावेळी शेतकरी काळे यांना उपस्थित भाजप पदाधिकाऱ्याने धक्काबुक्की करत बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. या प्रकारानंतर भाजप पदाधिकाऱ्यांवर बैठक गुंडाळण्याची नामुष्की ओढावली. चंद्रकांत पाटील यांनीही काढता पाय घेतला.

Madha Farmer
Nanded BJP News : नांदेडमध्ये चिखलीकरांच्या निवडणुकीची सुत्रं चव्हाणांच्या हाती..

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com