Chandrakant Patil-Nagesh Valyal  Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Solapur Politics : नागेश वल्याळ अन्‌ सहकारी चंद्रकांतदादांचे घरवापसीचे निमंत्रण स्वीकारणार का?

Chandrakant Patil offer To BRS Leader : माजी नगरसेवक वल्याळ आणि त्यांच्यासोबत गेलेल्या नेत्यांना चंद्रकांत पाटील यांनी ‘या चिमण्याने...परत फिरा...’ म्हणत पक्षात येण्याचे निमंत्रण दिले आहे.

Vijaykumar Dudhale

Solapur News : भारतीय जनता पक्षातून भारत राष्ट्र समितीमध्ये गेलेल्या सोलापुरातील नेत्यांचा भ्रमनिराश झालेला आहे. त्यांना पुन्हा भाजपमध्ये घेण्याचा प्रयत्न केला जाईल, असे सांगून राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री तथा भाजपचे वरिष्ठ नेते चंद्रकांत पाटील यांनी माजी नगरसेवक नागेश वल्याळ व त्यांच्या सहकाऱ्यांना ‘घरवापसी’चे आवताण दिले आहे. चंद्रकांतदादांचे आवताण वल्याळ आणि त्यांचे सहकारी स्वीकारणार का, असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होत आहे. (Chandrakant Patil's invitation to Nagesh Valyal and colleagues to rejoin BJP)

तेलंगणा विधानसभा निवडणुकीचे निकाल रविवारी (ता. 3 डिसेंबर) जाहीर झाले. त्यात सत्ताधारी बीआरएस (BRS) पक्षाचा दारुण पराभव झाला. काँग्रेसचे रेवंथ रेड्डी यांच्या झंझावतापुढे बीआरएसच्या ॲम्बेसिडचा पालपाचोळा झाला. त्यामुळे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांच्या योजनांना आकृष्ट होऊन ‘बीआरएस’वर स्वार झालेल्या महाराष्ट्रातील नेत्यांची मोठी गोची झाली आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

भारत राष्ट्र समितीमध्ये प्रवेश केलेल्या काही नेत्यांमध्ये भाजपच्या (BJP) लोकांचाही समावेश आहे. त्यात सोलापुरातील भाजपचे माजी खासदार (स्व.) लिंगराज वल्याळ यांचे चिरंजीव नागेश वल्याळ यांचा समावेश आहे. लिंगराज वल्याळ हे पुणे वगळता निवडून येणारे पश्चिम महाराष्ट्रातील भाजपचे पहिले खासदार होते. त्यामुळे वल्याळ कुटुंबीय आणि भाजप एक प्रकारचे समीकरण होते. मात्र, त्यांचे चिरंजीव नागेश वल्याळ (Nagesh Valyal) यांनी भाजपला जय श्रीराम करत बीआरएसच्या ॲम्बेसिडरमध्ये बसणे पसंत केले होते. त्यांच्यासोबत भाजपचे काही माजी नगरसेवकही बीआरएसमध्ये सामील झाले आहेत.

माजी नगरसेवक वल्याळ आणि त्यांच्यासोबत गेलेल्या नेत्यांना चंद्रकांत पाटील यांनी ‘या चिमण्याने...परत फिरा...’ म्हणत पक्षात येण्याचे निमंत्रण दिले आहे. आता हे निमंत्रण नागेश वल्याळ आणि त्यांचे सहकारी स्वीकारून घरवापसी करणार का, याकडे सोलापूरकरांचे लक्ष असणार आहे.

घरचा मुलगा चुकला असेल आणि घर सोडून गेला असेल तर त्याला परत घरात घेणं, ही भारतीय संस्कृती आहे. त्याचे आम्ही वाहक आहोत. त्यामुळे भाजपमधून बीआरएसमध्ये गेलेल्या नेत्यांना पुन्हा पक्षात प्रवेश देऊ, असे पालकमंत्री पाटील यांनी म्हटले आहे. ते पुढे म्हणाले की, तेलंगणात भाजप आमदारांची संख्या दुप्पट झाली आहे. याचा अर्थ आम्ही समाधानी आहोत, असे नाही. येत्या काळात तेलंगणात पक्षाची स्थिती आणखी सुधारेल.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT