Telangana's Giant Killer : केसीआर-रेवंथ रेड्डींना हरवणाऱ्या तेलंगणातील ‘जायंट किलर’ला सोलापुरातून ‘बूस्टर’

Sachin Kalyanshetti News : तेलंगणा भाजपचे प्रदेशाध्यक्ष कटीपल्ली रेड्डी यांच्या मतदारसंघाची जबाबदारी अक्कलकोटचे आमदार सचिन कल्याणशेट्टी यांच्याकडे देण्यात आली होती.
Sachin Kalyanshetti-Katipalli Reddy
Sachin Kalyanshetti-Katipalli ReddySarkarnama

Solapur News : तेलंगणाच्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष कटीपल्ली व्यंकटरमण रेड्डी यांनी कामारेड्डी मतदारसंघात चमत्कार केला आहे. तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव आणि भावी मुख्यमंत्री रेवंथ रेड्डी यांना पराभूत करत कटीपल्ली रेड्डी हे तेलंगणाच्या राजकारणात ‘जायंट किलर’ ठरले आहेत. रेड्डी यांच्या विजयासाठी सोलापुरातून रसद मिळाली असून, रणनीतीही सोलापुरातून ठरवली गेली. कटीपल्ली यांच्या विजयात अक्कलकोटचे आमदार तथा भाजपचे सोलापूरचे जिल्हाध्यक्ष सचिन कल्याणशेट्टी यांचे योगदान राहिले आहे. (MLA Sachin Kalyanshetti's contribution to 'Giant Killer' Katipalli Reddy's victory in Telangana)

भारतीय जनता पक्षाचे तेलंगणाचे प्रदेशाध्यक्ष कटीपल्ली रेड्डी यांनी विधानसभेच्या निवडणुकीत कामारेड्डी मतदारसंघातून मुख्यमंत्री केसीआर यांना आव्हान दिले होते. त्यांनी केवळ केसीआर यांनाच नव्हे, तर तेलंगणामध्ये काँग्रेसला निवडणूक जिंकून देणारे रेवंथ रेड्डी यांच्याशीही दोन हात करण्याची तयारी दाखवली, पण त्यासाठी त्यांनी मतदारसंघात फार पूर्वीपासून तयारी चालवली होती.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Sachin Kalyanshetti-Katipalli Reddy
Solapur Politics : पवारांनी प्रकल्प पळवलेला नाही, अन्न उत्कृष्टता केंद्र सोलापुरातच होणार; चंद्रकांतदादांचे स्पष्टीकरण

राज्यातील दोन मातब्बर नेत्यांना आव्हान देण्याची भाषा करणाऱ्या कटीपल्ली यांच्या कामारेड्डी या मतदारसंघाची जबाबदारी भाजपने विशेषतः उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोलापुरातील आपले लाडके आमदार सचिन कल्याणशेट्टी यांच्यावर सोपवली होती. कल्याणशेट्टी यांना यापूर्वी गोवा विधानसभा निवडणुकीच्या कामाचा अनुभव होता. कल्याणशेट्टी यांनी ती जबाबदारी अंगावर येताच थेट कामारेड्डी मतदारसंघ गाठला.

कामारेड्डी विधानसभा मतदारसंघात त्यांनी प्रथम शक्ती प्रमुख, मंडल प्रमुख आणि पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली. मतदारसंघाच्या संघटनात्मक कामांचा आढावा घेत पक्षाचे कार्यक्रमांच्या नियोजनासंदर्भात भाजपच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांशी चर्चा केली.

कामारेड्डी मतदारसंघातील संघटनात्मक बांधणी अधिकाधिक मजबूत व्हावी, यासाठी स्थानिक पदाधिकाऱ्यांची मते जाणून घेतली. त्यांना मार्गदर्शन करत कामाला लावले. मतदारसंघात विरोधकही मातब्बर होते, त्यामुळे रणनीतीही तशीच आखावी लागली. प्रत्यक्षात प्रचाराच्या काळात केसीआर आणि रेवंथ रेड्डी यांच्या तोडीस तोड प्रचार यंत्रणा राबवली.

Sachin Kalyanshetti-Katipalli Reddy
Telangana Election Result : गुलाबी ॲम्बेसिडर तेलंगणामध्येच पंक्चर; सोलापुरातील BRS नेत्यांचा जीव टांगणीला

कल्याणशेट्टी यांनी तब्बल दोन ते दीड महिने या मतदारसंघात तळ ठोकला होता. या वेळी अक्कलकोटमधूनही त्यांनी काही कार्यकर्त्यांना सोबत नेले होते. बूथप्रमुखांना सोबत घेऊन गोवोगावी आणि घरोघरी जाऊन प्रचार यंत्रणा राबवली. छोट्यातील छोट्या कार्यकर्त्याला कामाला लावले. दोन बलाढ्य विरोधकांशी निकराने टक्कर दिली आणि त्याचे फळ रविवारच्या (ता. 3 डिसेंबर) विजयात मिळाले.

Sachin Kalyanshetti-Katipalli Reddy
Assembly Election Result 2023 : अहंकारी माणसाला तीन राज्यांतील जनतेने दिले उत्तर; खासदार विखेंची राऊतांवर टीका

कटीपल्ली यांचा विजय प्रत्येकाच्या मेहनतीचा : कल्याणशेट्टी

कटीपल्ली व्यंकटरमण रेड्डी यांचा विजय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या गरीब कल्याणच्या अजेंड्याच्या, राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्या नेतृत्वात मेहनत घेतलेल्या प्रत्येक कार्यकर्त्याचा आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या मार्गदर्शनाखाली सर्वांच्या साथीने आणि मेहनतीने या यशाला गवसणी घालता आली, याचा मनस्वी आनंद आहे, असे आमदार सचिन कल्याणशेट्टी यांनी कटीपल्लींच्या विजयाबद्दल दिली.

Sachin Kalyanshetti-Katipalli Reddy
Chhattisgarh Election Result 2023 : कलेक्टरची नोकरी सोडली; पण पहिल्याच निवडणुकीत हार...आता 'सीएम'साठी नाव चर्चेत!

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com