Taufik Shaikh  Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Solapur NCP SP : पवारांच्या राष्ट्रवादीत चाललंय तरी काय? खुर्ची न दिल्याने कार्याध्यक्ष बैठकीतून निघून गेले, महिला कार्यकर्त्याही संतापल्या

Taufik Shaikh left Meeting : सोलापूर शहर आणि जिल्ह्यात पदाधिकाऱ्यांच्या मनमानी कारभारामुळेच पक्षाची ताकद कमी झाली आहे, असा आरोप तौफिक शेख यांनी केला, त्यामुळे येत्या काळात पक्षाला सोडचिठ्ठी देण्याचा इशारासुद्धा कार्याध्यक्ष शेख यांनी दिला.

विश्वभूषण लिमये

Solapur, 11 April : विधानसभा निवडणुकीनंतर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने सोलापुरात पश्चिम महाराष्ट्र विभागीय मेळावा आयोजित करण्यात आला होता, त्या मेळाव्यात पक्षश्रेष्ठींसमोरच नाराजीनाट्य घडले. मेळावा सुरू असताना बसायला खुर्ची दिली नाही म्हणून सोलापूर शहर कार्याध्यक्ष तौफिक शेख हे मेळावा सोडून निघून गेले. दुसरीकडे, व्यासपीठावर महिला पदाधिकाऱ्यांना स्थान दिल्याने महिलांनीही नाराजी व्यक्त केली. कार्यकर्त्यांशी चर्चा करून पुढील निर्णय घेणार असल्याचेही या वेळी महिला व पुरष पदाधिकाऱ्यांनी सांगितले.

ज्येष्ठ नेते शरद पवार हे उद्या (ता. १२ एप्रिल) सोलापूर दौऱ्यावर येत आहेत. त्या पार्श्वभूमीवर पश्चिम महाराष्ट्राचे प्रभारी हर्षवर्धन पाटील आणि शशिकांत शिंदे यांच्या उपस्थितीत सोलापूर शहर आणि ग्रामीण राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचा (NCP SP) मेळावा भरवण्यात आला होता. विधानसभा निवडणुकीनंतर पक्षाचा प्रथमच जाहीर कार्यक्रम होता, त्यामुळे गर्दीही मोठ्या प्रमाणात झाली होती.

मेळावा सुरू असताना बसायला खुर्ची दिली नाही; म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे शहर कार्याध्यक्ष तौफिक शेख (Taufik Shaikh) हे भरसभेतून निघून गेले. सोलापूर शहर आणि जिल्ह्यात पदाधिकाऱ्यांच्या मनमानी कारभारामुळेच पक्षाची ताकद कमी झाली आहे, असा आरोप तौफिक शेख यांनी केला, त्यामुळे येत्या काळात पक्षाला सोडचिठ्ठी देण्याचा इशारासुद्धा कार्याध्यक्ष शेख यांनी दिला.

दरम्यान, ज्येष्ठ नेते शरद पवार हे उद्या सोलापूरच्या दौऱ्यावर येत आहे. त्यांची भेट घेऊन त्यांच्या कानावर हा आज घडलेला विषय टाकणार आहे, असेही तौफिक शेख यांनी स्पष्ट केले.

एकीकडे, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे सोलापूर शहर कार्यध्यक्ष तौफिक शेख हे निघून गेले. दुसरीकडे, माजी सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील आणि आमदार शशिकांत शिंदे यांच्यासमोरच महिला आणि पुरुष पदाधिकाऱ्यांची नाराजी व्यक्त केली. शहर कार्याध्यक्ष तौफिक शेख बैठकीतून संतापून निघाले. पक्षात आम्हाला कोणत्याही पद्धतीची सन्मानाची वागणूक मिळत नाही, त्यामुळे मी बैठकीतून निघून जात आहे. त्याचवेळी महिला पदाधिकाऱ्यांकडूनही हर्षवर्धन पाटील आणि शशिकांत शिंदे यांच्या समोरच मोठमोठ्याने ओरडून नाराजी व्यक्त केली.

शहर कार्याध्यक्ष तसेच महिला पदाधिकाऱ्यांना देखील व्यासपीठावर स्थान दिले जात नाही. तसेच मेळावा घेण्याबाबत आम्हाला कोणतीही कल्पना दिली जात नाही. पक्षाचे शहराध्यक्ष आणि ठराविक कार्यकर्तेच पक्षांमध्ये पुढे पुढे करतात, त्यामुळे आम्ही पक्षातून बाहेर पडण्याचा निर्णय घेत आहोत. कार्यकर्त्याशी चर्चा करून आम्ही पुढची भूमिका घेणार आहोत, असेही महिला कार्यकर्त्यांनी सांगितले.

दरम्यान, पक्षाचे अध्यक्ष शरद पवार हे उद्या सोलापूरच्या दौऱ्यावर येत आहेत, त्यांना भेटून आजच्या घडलेल्या प्रकाराबाबत माहिती देण्यात येईल. तसेच, पक्षातील मनमानी कारभाराबाबतचही माहिती आम्ही पवारांना देणार आहोत, असेही त्यांनी स्पष्ट केले.

Edited By : Vijay Dudhale

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT