Sambhaji Chhatrapati and CM Shinde Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Maratha Reservation : राज्य सरकारचं चुकलं; मराठा आरक्षणाबाबत संभाजीराजेंनी जे सांगितलं तेच...

Manoj Jarange Patil Mumbai Morcha : संभाजीराजे छत्रपती यांचा राज्य सरकारला मोलाचा सल्ला

Rahul Gadkar

Kolhapur News : राज्य मागासवर्ग आयोगाच्या सर्वेक्षण प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. त्यावर माजी खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी आपली भूमिका स्पष्ट करत, मराठा आरक्षण देण्यासाठी मराठा समाजाची दिशाभूल करू नये, समाजाला आरक्षण देण्यासाठी राज्य सरकारने प्रामाणिक प्रयत्न करून त्यासाठी शॉर्टकट मारू नये, असा मोलाचा सल्ला संभाजीराजे छत्रपती यांनी दिला. कोल्हापुरात मंगळवारी झालेल्या पत्रकारपरिषदेत ते बोलत होते.

'मराठा समाजाचे सर्वेक्षण करण्याचे ठरवले आहे, हे आनंदाचे आहे. आरक्षण मिळवायचे असेल तर सर्वेक्षण करावे लागणार ही मागणी मी पूर्वीपासून करीत होतो. मात्र आता इतक्या वर्षांनी सरकारने सुरू केलं हे आनंदाची गोष्ट आहे. आता सर्वेक्षण करताना कोणत्याही त्रुटी राहू नये, याची काळजी सरकारने घ्यायला पाहिजे, असे संभाजीराजे छत्रपती म्हणाले.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

'याआधी मराठा समाज मागास नाही, हे कोर्टानं सांगितलं आहे. त्यामुळे प्रश्न किती आहेत, त्यापेक्षा परिपूर्ण सर्वेक्षण करावे. कुणालाही खुश करण्यासाठी शॉर्टकट वापरू नका, नाहीतर पुन्हा कोर्टात हे टिकणार नाही. सात दिवसांपेक्षा चार महिने लागू द्या, पण आरक्षणासाठी प्रामाणिक प्रयत्न केले पाहिजेत, असे मत संभाजीराजे छत्रपती यांनी व्यक्त केले.

ओबीसी समाज आणि मराठा समाजामध्ये सुरू असलेल्या वादाबाबत संभाजीराजे छत्रपती यांनी छगन भुजबळ यांना जरा यामधून बाहेर राहू द्या. पण न्यायालयीन विचार आणि भावनिक विचार याचा समतोल राखून मराठा समाजाला आरक्षण देता येईल हे पाहणे, राज्य सरकारचे काम आहे. त्यामुळे दोन्ही समाजाने संयम राखणे गरजेचे आहे, असे मत व्यक्त केले.

'राज्य सरकारचं मुळात चुकलं आहे. मी बोललो होतो, मनोज जरांगे-पाटील यांना मुंबईत येण्याची गरज का तयार करताय ? सरकार तातडीने घोषित का करीत नाही की, आम्हाला कशा पद्धतीने आरक्षण देणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लक्ष घातलं तर हा प्रश्न तातडीने सुटेल. क्युरेटिव्ह पिटीशनवर सुनावणी होईल आणि मराठा समाजाची बाजू ऐकून घेतली जाईल, छत्रपती शिवाजीमहाराजांची शपथ घेतली, हे मुख्यमंत्र्यांनी धाडस केलं. पण आरक्षण कसं देणार हे सांगावं, निवडणुका समोर आहेत, म्हणून कसही सर्वेक्षण करू नका. आठ दिवसांपेक्षा चार महिने घ्या, पण मराठा समाजाची पुन्हा फसवणूक नको,' अशी भूमिका संभाजीराजे छत्रपती यांनी मांडली.

दरम्यान, अयोध्येत राम मंदिर लोकार्पण सोहळा पार पडला. सोहळ्यादरम्यान गोविंद गिरी महाराज यांनी छत्रपती शिवाजीमहाराज यांचे गुरु समर्थ रामदास असा उल्लेख केला. त्याला संभाजीराजे छत्रपती यांनी छत्रपती शिवाजीमहाराज यांचे गुरु केवळ आईसाहेब जिजाऊ होत्या, असा मुद्दा मांडला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची तुलना छत्रपती शिवरायांशी केली. त्यावर बोलताना, गोविंद गिरी महाराज काय म्हणालेत, हे मी ऐकलं नाही. त्यामुळं यावर ठोस बोलणं उचित होणार नाही. छत्रपती शिवाजीमहाराज यांची कुणाशीही तुलना होऊ शकत नाही, असे स्पष्टीकरण संभाजीराजे छत्रपती यांनी दिले.

(Edited By : Ganesh Thombare)

R...

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT