Udhhav Thakeray On Ambulance Scam : ठाकरेंनी 'अ‍ॅम्ब्युलन्स'चे वाजवले 'सायरन' : शिंदे-फडणवीस-पवार सरकारची उडणार झोप

Udhhav Thckeray On Ambulance Scam : "सरकारनामाच्या हवाल्याने ठाकरेंनी वाजवले 'सायरन,' आता शिंदे-फडणवीस-पवार सरकारची उडणार झोप..."
Udhhav Thckeray On Ambulance Scam :
Udhhav Thckeray On Ambulance Scam : Sarkarnama
Published on
Updated on

Nashik News : कोविड बॉडी बॅग्जपासून जंबो कोविड सेंटरमधील घोटाळ्याच्या प्रकरणावर शिंदे सरकारने ठाकरेंच्या शिलेदारांना तुरुंगात डांबले असतानाच, शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आता अ‍ॅम्ब्युलन्स घोटाळ्यावरून शिंदे-फडणवीस-सरकारला जबरदस्त डोस दिला, 'अरे तुम्ही तर इतके निर्लज्ज आहात की, गरीब रुग्णांसाठी असलेल्या अ‍ॅम्ब्युलन्स योजनेतील पैसे खाल्ले, अशा शब्दांत निशाणा साधत ठाकरेंनी या घोटाळ्याला शिंदेच जबाबदार असल्याचे थेट सांगितले.

राज्यातील तब्बल आठ हजार कोटींचा 'अ‍ॅम्ब्युलन्स घोटाळा' 'सरकारनामा'ने उघडकीस आणला आहे. त्यानंतर विरोधकांनी सरकारला या घोटाळ्यावरून घेरले. विरोधकांच्या आक्रमक पवित्र्यानंतर या टेंडरमध्ये काही बदल करून, राज्य सरकारने एकप्रकारे हा घोटाळा कबूलच केला आहे. त्यानंतर आता ठाकरेंनीही या घोटाळ्यावरून शिंदे सरकारला आरोपीच्या पिंजऱ्यात उभे केले आहे. परिणामी अ‍ॅम्ब्युलन्स घोटाळ्याचे सायरन आता वाजणार, हे नक्की. (Latest Marathi News)

काय म्हणाले उद्धव ठाकरे?

नाशिक येथील शिवसेना ठाकरे गटाच्या राज्यव्यापी अधिवेशनात उद्धव ठाकरेंनी शिंदे-फडणवीस-पवार सरकारवर अ‍ॅम्ब्युलन्स घोटाळ्याचा आरोप केला. अ‍ॅम्ब्युलन्स गरिबांसाठी असलेल्या योजनेत सरकारने पैसे खाल्ल्याचा आरोप ठाकरेंनी जाहीरपणे केला. ठाकरे म्हणाले, "कोरोनाकाळातल्या आरोग्य विभागातील काही व्यवहारात आमच्यावर आरोप केला जातो. कोरोनाकाळातील पीएम केअर फंडाच्या निधीचीही चौकशी व्हायला पाहिजे. अरे तुम्ही तर गरीब रुग्णांसाठी असलेल्या अ‍ॅम्ब्युलन्स योजनेतील पैसे खाल्ले."

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Udhhav Thckeray On Ambulance Scam :
Ambulance Tender Scam : शिंदे-फडणवीस-पवार सरकारचा मोठा अ‍ॅम्ब्युलन्स घोटाळा; विरोधकांचा सायरन वाजणार...

संजय राऊतांनीही घेतली दखल -

आठ हजार कोटींचा अ‍ॅम्ब्युलन्स घोटाळा करण्यासाठी एका अधिकाऱ्यावर दबाव आणण्यात आला. आरोग्य विभागाचाच नव्हे, तर राज्यात झालेला हा सगळ्यात मोठा घोटाळा आहे. घोटाळेबाज व्यक्ती सरकारमध्ये बसल्या आहेत. मात्र त्याबद्दल कोणीही बोलण्यास तयार नाही. हा पैसा नेमका महाराष्ट्रात जातो की दिल्लीत जातो, की गुजरातला जातो? आमदार आमच्यापासून तोडले त्या आमदारांना हा पैसा वाटला, की विधानसभाध्यक्ष नार्वेकरांना आमच्याविरोधात निकाल देण्यासाठी हा पैसा देण्यात आला, असा थेट सवाल संजय राऊत यांनी उपस्थित केला होता.

काय आहे अ‍ॅम्ब्युलन्स घोटाळा ?

राज्यभरातील गरीब आणि गरजू रुग्णांसाठी आधार ठरलेल्या सरकारी अ‍ॅम्ब्युलन्समधून (108) वारेमाप पैसा कमाविण्याची 'योजना' सरकारमधील काही मंडळींनी केल्याचे समोर आले होते. वरिष्ठ आयएएस अधिकाऱ्यांना 'बदली'ची भीती दाखवून अ‍ॅम्ब्युलन्सचे साडेतीन-चार हजार कोटीपर्यंतचे टेंडर तब्बल 8 हजार कोटींपर्यंत फुगवल्याचेही यातून उघड-उघड दिसत आहे. सरकारमधील काही नेत्यांचे बारा महिने खिसे गरम ठेवणाऱ्या आणि परदेशवाऱ्या घडविणाऱ्या एका ठेकेदाराला हे काम देण्याचा आटापिटा अख्ख्या सरकारनेच केलेल्याचे आढळून आले.

सुमारे आठ हजार कोटी रुपयांपर्यंतच्या टेंडरसाठी 21 दिवसांचा अवधी अपेक्षित असतानाही केवळ 7 दिवसांतच टेंडर उघडल्याचे समोर आले होते. परिणामी, गरीब रुग्णांच्या योजनेच्या या टेंडरमध्ये 8-10 हजार कोटींचा महाघोटाळा झाल्याची भीती आहे.

R...

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com