Maratha Reservation : छत्रपती संभाजीराजे, उदयनराजेंच्या पुढाकारातून सर्वपक्षीय खासदारांच्या बैठकीत दोन महत्त्वाचे ठराव

Political News : मराठा आरक्षणाला अनुकूल असलेले दोन ठराव सर्वपक्षीय खासदारांच्या बैठकीत एकमताने संमत.
udyanraje, sambhjiraje
udyanraje, sambhjirajeSarkarnama

Political News : मराठा समाजाला कायदेशीर पातळीवर टिकणारे आरक्षण मिळावे, यासाठी अत्यंत महत्वाच्या असणाऱ्या काही मुद्द्यांवर प्रकाश टाकत या मुद्द्यांना घेवून मराठा समाजाला कायदेशीर पातळीवर टिकणारे आरक्षण मिळावे यासाठी सर्वपक्षीय खासदारांनी एकत्रित येवून संसदेत आग्रही भूमिका मांडावी, असे आवाहन या बैठकीत माजी छत्रपती संभाजीराजे यांनी केले.

नवी दिल्लीमधील नवीन महाराष्ट्र सदन येथे सोमवारी छत्रपती संभाजीराजे (Chhatrapati SambhajiRaje) यांच्या पुढाकारातून महाराष्ट्रातील सर्वपक्षीय खासदारांची बैठक पार पडली. या बैठकीला सर्वपक्षीय २३ खासदारांची उपस्थिती होती. गेल्या अनेक वर्षांपासून मराठा समाज आरक्षण मिळावे यासाठी सनदशीर मार्गाने आंदोलन करत आहे. २०१६ मध्ये तब्बल ५८ मोर्चे मराठा समाजाने काढले होते, त्या पूर्वी देखील मराठा समाजाने अनेक मोठी आंदोलने केली होती. मी स्वतः मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी जनजागृती करण्यासाठी राज्यभर अनेक दौरे व आंदोलने केली होती, असे संभाजीराजे म्हणाले.

udyanraje, sambhjiraje
Deputy Chief Minister : उपमुख्यमंत्र्यांचे देवगिरीतील कार्यालय सुरू, मानद सचिव संदीप जोशींनी सांभाळले काम !

मराठा समाजाच्या आंदोलनाची दखल घेवून २ वेळा महाराष्ट्र सरकारने आरक्षण जाहीर केले होते, मात्र सर्वोच्च न्यायालयात मराठा आरक्षण टिकले नाही. आता पुन्हा एकदा मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी राज्यभर मराठा समाज आंदोलन करत आहेत, असे संभाजीराजे म्हणाले.

देशातील अनेक कायदेतज्ञ, अभ्यासक यांच्याशी चर्चा करून कायदेशीर पातळीवर टिकणारे आरक्षण कसे मिळेल यासाठी प्रयत्न आम्ही करतोय. मात्र कायदेशीर पातळीवर टिकणारे आरक्षण मिळावे यासाठी संसदेत देखील याबाबत आग्रही व अभ्यासपूर्ण मांडणी करणे आवश्यक असल्यामुळे महाराष्ट्रातील सर्वपक्षीय खासदारांची बैठक आयोजित केल्याचे मत संभाजीराजे यांनी व्यक्त केले.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

संभाजीराजे यांनी प्रामुख्याने मराठा समाजाला कायदेशीर पातळीवर टिकणारे आरक्षण मिळावे यासाठी मागास ठरवणे गरजेचे आहे, असे सांगताना पुढील काळात मागास ठरविण्याचा फॉर्म्युला १०० पैकी किती ? असा असावा असे मत व्यक्त केले. त्यासोबतच अपवादात्मक परिस्थिती सिद्ध करण्यासाठी १९९२ चे निकष सध्याच्या परिस्थितीत लागू होऊ शकत नसल्यामुळे हे निकष बदलण्यात यावे, अशी मागणी करताना खासदारांनी हा विषय संसदेत मांडावा. पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra modi) यांच्यापर्यंत हा विषय नेण्यात यावा, अशी मागणी केली. या बैठकीत उपस्थित सर्वच खासदारांनी एकमुखाने या बैठकीत संभाजीराजे यांच्या मागणीला पाठिंबा दिला .

हे खासदार होते बैठकीला उपस्थित

या बैठकीला छत्रपती उदयनराजे यांच्यासह केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे, केंद्रीय मंत्री डॉ. भारती पवार, प्रफुल पटेल, गजानन किर्तीकर, श्रीकांत शिंदे, हेमंत गोडसे, राहुल शेवाळे, संजय मंडलिक, धैर्यशील माने, धनंजय महाडिक, भावना गवळी, रणजितसिंह नाईक निंबाळकर, ओमराजे निंबाळकर, प्रतापराव जाधव, कपिल पाटील, प्रताप पाटील चिखलीकर, कृपाल तुमाने, उन्मेष पाटील, सदाशिव लोखंडे या सर्व खासदार उपस्थिती होती. खासदारांच्या बैठकीत एकमताने ठराव संमत करण्यात आले.

(Edited by Sachin Waghmare)

udyanraje, sambhjiraje
Maratha Reservation :मराठा आरक्षणाची मोठी अपडेट; न्या. शिंदे समितीचा दुसरा अहवाल राज्य सरकारकडे सादर

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com